अंबरनाथमध्ये काँग्रेस-शिवसेना वाद पेटला | शिवसेना आमदाराला थेट इशाराच दिला

अंबरनाथ, १८ डिसेंबर: एकीकडे राज्यात महाविकास आघाडीत मित्र पक्ष असलेले शिवसेना, काँग्रेसचे स्थानिक पातळीवर अजून देखील मनोमिलन झालेले नाही, हे स्पष्ट होते आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत वाद पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अंबरनाथमध्ये स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि शिवसेनेत तीव्र मतभेद झाल्याचं (Ambernath City clashes betwen congress and Shivsena party leaders) समोर आलं आहे. शिवसेना आमदाराला मतदारसंघात फिरू देणार नाही, असा थेट इशाराच काँग्रेसने दिला आहे. पाणी प्रश्नावरून अंबरनाथच्या स्थानिक पातळीवर शिवसेना आणि काँग्रेस पक्षातील वाद उफाळून आला आहे.
अंबरनाथ शहरात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने काँग्रेसने आज पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन (Ambernath congress party leaders protest for water supply in city) केले. शहरातील अनेक भागात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याची समस्या तीव्र होत असल्याने नागरिकांना यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करताना दुजाभाव करत आहे, असा आरोप करत पाणी टाकीवर चढून काँग्रेसने पाणी पुरवठा विभागाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.
अंबरनाथ शहरातील इतर समस्या नगरसेवक सोडवतात, आमदारांनी निदान पाणी प्रश्न तरी सोडवावा, परंतु निवडून आल्यानंतर आमदारांना अहंकार आल्याने त्यांना कोणाची गरज नाही, शिवसेनेच्या खासदार आणि पालकमंत्र्यांनी आमदारांना समज द्यावी अन्यथा मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा अंबरनाथ काँग्रेसने दिला आहे.
दरम्यान, ‘हे आंदोलन शिवसेनेला बदनाम करण्यासाठी आणि फसवं आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे देयकाची थकबाकी होती, ती आज 4 कोटी 38 लाख रुपये एमआयडीसीला भरले आहे. शिवाय वाढीव 4 एमएलडी पाणीदेखील शहराला मिळणार असल्याने पाणी समस्या दूर होणार आहे. केवळ पालिका निवडणूक जवळ आल्याने शिवसेनेला बदनाम करण्यासाठी हे केलं जातं आहे,’ असं अंबरनाथ मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी स्पष्ट केलं आहे. This is being done only to discredit the Shiv Sena as the municipal elections are approaching, ‘said MLA of Ambernath constituency Dr. Balaji Kinikar has clarified.
News English Summary: In Ambernath, at the local level, there are sharp differences between Congress and Shiv Sena (Ambernath City clashes between Congress and Shivsena party leaders). The Congress has given a direct warning that Shiv Sena will not allow the MLA to roam in the constituency. The water issue has sparked a dispute between Shiv Sena and Congress at the local level in Ambernath. This is being done only to discredit the Shiv Sena as the municipal elections are approaching, ‘said MLA of Ambernath constituency Dr. Balaji Kinikar has clarified.
News English Title: Ambernath City clashes between congress and Shivsena party leaders over Shivsena MLA Balaji Kinikar news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL