22 November 2024 6:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सोनिया गांधींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र दबावतंत्र नाही | किमान समान कार्यक्रमावर पत्र

Shivsena MP Sanjay Raut, Sonia Gandhi, CM Uddhav Thackeray

मुंबई, १९ डिसेंबर: महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेसची नाराजी नसून किमान समान कार्यक्रमावर पत्र लिहिण्यात आल्याचं वृत्त आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांनी ठाकरे सरकारवर दबाव टाकल्याच्या चर्चा सुरु झाल्याने यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारनं किमान समान कार्यक्रम राबवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. राज्यात मागासवर्गीय समाजांसाठी असलेल्या योजना राबवाव्यात, त्यांना निधी देण्यात येवा एसं एच के पाटलांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील आदिवासी आणि दलित समाजाच्या विकासासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या दोन पानी पत्राद्वारे त्यांनी आदिवासी आणि दलित विकासासाठी लागणारा निधी देण्याची विनंती ठाकरे सरकारला केली होती. तसेच मोठ्या प्रमाणावर जनकल्याणकारी योजना राबवण्याचा सल्लाही त्यांनी ठाकरे सरकारला दिला होता. भविष्यात आदिवासी, दलित लोकांच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, याची शाश्वती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली असल्याची माहिती महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली.

दरम्यान, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (UPA Chief Sonia Gandhi) या UPA च्या अध्यक्ष आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार बनवण्यात सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे सोनिया गांधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र म्हणजे दबावतंत्र नाही, असा खुलासा शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Shiv Sena MP Sanjay Raut) केला आहे. सोनिया गांधीच्या पत्राचं स्वागत व्हावं. किमान समान कार्यक्रम महत्वाचा आहे. सरकारची गाडी रुळावर आली असल्याचं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

 

News English Summary: Congress leader Sonia Gandhi is the president of the UPA. Sonia Gandhi and NCP President Sharad Pawar have played an important role in forming the Mahavikas Aghadi government in the state. Therefore, the letter written by Sonia Gandhi to Chief Minister Uddhav Thackeray is not a pressure mechanism, Shiv Sena MP Sanjay Raut has revealed. Sonia Gandhi’s letter should be welcomed. At least the same program is important. Sanjay Raut said that the government vehicle was on track.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut clarification on letter wrote by Sonia Gandhi to CM Uddhav Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x