22 April 2025 6:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRFC Share Price | 433 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC NBCC Share Price | 4 रुपयांचा शेअर 101 रुपयांवर आला, जबरदस्त तेजीत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC
x

शेतकरी आंदोलन | डॅमेज कंट्रोलसाठी भावनिक अस्त्र | मोदींची गुरुद्वाराला भेट

PM Narendra Modi, damage control, Visiting Gurudwara

नवी दिल्ली, २० डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी दिल्लीतील एका गुरुद्वाराला भेट दिली आहे. दिल्ली स्थित गुरुद्वारा रकाबगंजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आणि गुरु तेगबहादुर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अगदी अचानक त्यांचा हा दौरा झाला आहे. या दौऱ्यादरम्यान वाहतूक देखील थांबवण्यात आली नाही.

याठिकाणी वाहतूक तर थांबवण्यात आलं नव्हतच पण सामान्य दिवसाप्रमाणेच व्यवस्था होती. सुरक्षा व्यवस्था देखील नेहमीप्रमाणेच होती. यावेळी कोणता विशेष पोलीस बंदोबस्त करण्यात आला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी गुरु तेगबहादुर यांच्या त्यागाचं स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

नरेंद्र मोदींनी दिल्लीतील रकाबगंज येथील गुरुद्वारात जाऊन शीख समुदायाचे 9 वे गुरू तेग बहादूर यांना नमन केले. गुरू तेग बहादूर यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मोदींचा आजचा गुरुद्वाराचा दौरा अचानक ठरल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. मोदींच्या गुरुद्वारा भेटीचं कुठलंही नियोजन नव्हता, विशेष म्हणजे मंदिर व्यवस्थापनालाही यासंदर्भात काहीही कल्पना नव्हती. त्यामुळे, मोदींच्या या दौऱ्यावर चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना आणि देशताली सर्व जनतेपर्यंत सरकारचं म्हणणं पोहोचावं यासाठी कृषीमंत्री तोमर यांनी शेतकऱ्यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये ते म्हणतात, “कृषी कायद्यातील सुधारणांबाबत काही शेतकरी संघटनांनी एक भ्रम निर्माण केला आहे. देशाचा कृषीमंत्री या नात्याने प्रत्येक शेतकऱ्यांचा भ्रम दूर करणे, प्रत्येक शेतकऱ्यांची चिंता दूर करणे माझे कर्तव्य आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये दिल्ली तसेच आजूबाजूच्या परिसरात असत्याची भिंत उभी करण्यासाठीचा कट रचला जात आहे, त्याबाबत सत्य आणि योग्य वस्तुस्थिती आपल्या समोर ठेवणं ही माझी जबाबदारी आहे.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi visited a gurdwara in Delhi on Sunday morning. Prime Minister Narendra Modi visited Gurdwara Rakabganj in Delhi and paid homage to Guru Teg Bahadur. All of a sudden they have this tour. Traffic was also not stopped during the tour.

News English Title: PM Narendra Modi damage control through visiting Gurudwara in Delhi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या