मेट्रो कारशेड | माझ्या मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी - मुख्यमंत्री
मुंबई, २० डिसेंबर: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील कोरोना परिस्थिती, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन, मुंबईसह राज्यात नाइट कर्फ्यू आणि लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याची आवश्यकता नाही, अशा विविध मुद्द्यांमध्ये मुख्यमंत्र्यांना हात घातला. State Chief Minister Uddhav Thackeray on Sunday interacted with the people of the state through social media.
मागील काही महिन्यांपासन मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी प्रस्तावित असलेल्या कांजूरमार्ग येथील जागेवरून सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. अशातच सध्या हे प्रकरण न्यायालयातही गेलं आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं. मुंबईच्या महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला. For the past few months, the government has been criticized by the opposition over the proposed site for the Mumbai Metro car shed at Kanjurmarg.
‘कांजूर मेट्रो कारशेडचा वाद चालला आहे तो जनतेच्या हिताचा नाहीये. माझं विरोधी पक्षाना आवाहन आहे तुम्ही या आणि हा प्रश्न सोडवा. आम्ही तुम्हाला श्रेय द्यायला तयार आहे. चर्चेदरम्यान कांजूर मेट्रो कारशेशेडचा हा प्रश्न सोडवू शकतो. हा माझ्या अहंकाराचा प्रश्न नाहीये तुमच्याही नसला पाहिजे,’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
मेट्रो कारशेडच्या विषयावरुन सध्या थयथयाट केला जातोय, मी अहंकारी. जरुर मी अहंकारी आहे, माझ्या मुंबईबद्दल मी अहंकारी आहे. माझ्या मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंनी नाव न घेता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलंय. मेट्रो 3 च्या लाईनसाठी कांजूरमार्ग आहे. आरे कारशेडसाठी आपण किती जागा घेतली होती, साधरणत: 30 हेक्टर जागा आपण घेतली होती. 5 हेक्टरमध्ये घटदाट झाडी असल्याने ती जागा वापरणार नसल्याचं आपण आज लेखी दिलंय. आता, ती जागा वापरणार नाही तर मग या प्रकल्पात घेतली कशाला? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. तसेच, 2023 उर्वरीत 25 हेक्टरची जागा वापरल्यानंतर पुन्हा ती 5 हेक्टरची जागाही वापरली जाणार, पुन्हा आणखी जागा घेतली जाईल. एका लाईनसाठी आपण जंगल नष्ट करायचं का, असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले. (After using the remaining 25 hectares of land in 2023, the remaining 5 hectares will be used again. Chief Minister Uddhav Thackeray also asked whether we want to destroy the forest for one line).
आता कांजूरमार्ग येथे 40 हेक्टर जागा आहे, तो सर्वच प्रदेश ओसाड आहे. यापूर्वी आरेला केवळ मेट्रो 3 ची लाईन होणार होती. पण, आता कांजूर येथे मेट्रो 3, 4 आणि 6 या तीन लाईनचे कारशेड आपण करू शकतो, हा फरक आहे. त्याहीपलिकडे, मेट्रोची लाईन ही अंबरनाथ व बदलापूरपर्यंत जाऊ शकते. पुढील 50 वर्षांच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. आम्ही करतोय, ते अहंकार आहे की कर्तव्य हे आता तुम्हीच सांगा, असेही त्यांन जनतेला उद्देशून म्हटले. (Arela was only going to have a Metro 3 line. But, now we can do the carshed of three lines Metro 3, 4 and 6 at Kanjur, this is the difference).
News English Summary: State Chief Minister Uddhav Thackeray on Sunday interacted with the people of the state through social media. The Chief Minister touched on various issues like Corona situation in the state, appeal to wear masks in public places, no need to re-impose night curfew and lockdown in the state including Mumbai.
News English Title: Chief Minister Uddhav Thackeray address the state over social media on many issues news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल