22 April 2025 7:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Maharashtra Congress | मुंबईत भाई जगताप यांच्यासोबत अनुभवी टीमही मैदानात

Maharashtra committee, Mumbai Congress, MLA Bhai Jagtap

मुंबई, २० डिसेंबर: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही महाविकास आघाडीनं भाजपला जोरदार धक्का दिलाय. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल, असा दावा केला जातोय. अशावेळी मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केलीय.

काँग्रेस हायकमांडकडून शनिवारी भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आज भाईंनी मोठं वक्तव्य केलंय. मुंबईत काँग्रेस विरोधी पक्षात आहे. त्यामुळे इतर सगळ्यांना विरोध राहील, अशी घोषणाच जगताप यांनी केली आहे. मुंबईत कॅप्टन म्हणून बदल निश्चित करुन दाखवणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. माझ्या साथीला अनुभवी आणि चांगली टीम दिली आहे. नाराज नेत्यांना सोबत घेऊन काम करणार. सगळ्यांना बरोबर घेऊन काम करेन. कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम करेन, असंही भाई जगताप म्हणाले.

दरम्यान, कॉंग्रेस हायकमांडने शनिवारी मुंबई प्रदेश कॉंग्रेस कमिटीत बदल केले आहेत. जवळपास अडीच वर्षांनंतर भाई जगताप यांच्याकडे मुंबई काँग्रेसची धुरा देण्यात आली आहे. जगताप यांच्यासोबत अनुभवी टीमही देण्यात आली आहे. चरणजीत सिंग सप्रा यांची कार्याध्यक्षपदी, माजी मंत्री नसीम खान यांची प्रचार समिती प्रमुखपदी तर सुरेश शेट्टी यांची जाहीरनामा प्रमुखपदी वर्णी लागली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून एकनाथ गायकवाड यांना हटवण्यात आलं आहे. गायकवाड हे यापुढेही मुंबई काँग्रेसला आपलं मार्गदर्शन करतील, अशी आशा पक्षाने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Maharashtra Congress President Balasaheb Thorat ) यांच्यावर मात्र काँग्रेस हायकमांडने पुन्हा विश्वास टाकला आहे. थोरात यांच्या नेतृत्वात मुंबई कॉंग्रेससाठी छाननी समिती आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनिती आखण्याकरता समिती स्थापन करण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाचे नेतेही आहेत.

 

News English Summary: The Congress High Command on Saturday made changes in the Mumbai Pradesh Congress Committee. After nearly two and a half years, Bhai Jagtap has been given the reins of Mumbai Congress. An experienced team has also been provided along with Jagtap. Charanjit Singh Sapra has been appointed as the working chairman, former minister Naseem Khan as the head of the campaign committee and Suresh Shetty as the manifesto head. Eknath Gaikwad has been removed from the post of Mumbai Congress president. The party hopes that Gaikwad will continue to guide the Mumbai Congress.

News English Title: Maharashtra committee major changes done from high command including Mumbai Congress news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या