24 November 2024 3:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

मेट्रो ३ कारशेड | शरद पवार मध्यस्थी करणार | चर्चेतून मार्ग काढणार

NCP President Sharad Pawar, Mumbai Metro 3, car shed Plot

मुंबई, २० डिसेंबर: ‘कांजूरमार्गची जमीन ही केंद्राची असेल नसेल हा वाद आपण सोडवू शकतो. केंद्रानं आणि राज्यानं मिळून चर्चेदरम्यान हा वाद सोडवला पाहिजे,’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केलं आहे. याचवेळी मेट्रो कारशेडवरून सरकारला वेळोवेळी लक्ष्य करणाऱ्या विरोधकांनाही मुख्यमंत्र्यांनी एक आवाहन केलं आहे.

‘कांजूर मेट्रो कारशेडचा वाद चालला आहे तो जनतेच्या हिताचा नाहीये. माझं विरोधी पक्षाना आवाहन आहे तुम्ही या आणि हा प्रश्न सोडवा. आम्ही तुम्हाला श्रेय द्यायला तयार आहे. चर्चेदरम्यान कांजूर मेट्रो कारशेशेडचा हा प्रश्न सोडवू शकतो. हा माझ्या अहंकाराचा प्रश्न नाहीये तुमच्याही नसला पाहिजे,’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या वादात मेट्रो कारशेडचा प्रकल्प प्रलंबित आहे. या वादात केंद्राने देखील उडी घेत कांजूरमार्ग येथे होणाऱ्या प्रस्तावित मेट्रो कारशेडला विरोध करत कोर्टाचे दार ठोठावले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत अधिकच वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार मध्यस्थी करणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे. शरद पवार म्हणाले याबद्दल कुठे तरी एकोपा निर्माण करायला पाहिजे. मुख्यमंत्री म्हणाले जर वाद सोडून यावर मार्ग निघाला तर बघायला हवा. याबाबत शरद पवार प्रयत्न करत आहेत. गरज पडली तर एकदोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील ते चर्चा करतील. मुंबईच्या विकासात अडथळा नको यासाठी मुख्यमंत्री देखील प्रयत्न करत असून यात पवार मध्यस्थी करत असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. आधीपासून आमची भूमिका सामंजस्याची आहे. पण काही लोक यात राजकारण करत आहेत. म्हणून पवार साहेब यात मध्यस्थी करत असल्याचे ते म्हणाले.

 

News English Summary: The Metro car shed project has been pending for the past few days in a dispute between the ruling party and the opposition. The Center has also jumped on the bandwagon to oppose the proposed metro car shed at Kanjurmarg. Therefore, the complexity of this case is increasing. Against this backdrop, Minister Nawab Malik has informed that Sharad Pawar will mediate the survey of NCP.

News English Title: NCP President Sharad Pawar mediate to resolve metro 3 car shed issue news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x