23 November 2024 11:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024
x

ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा कोरोना | केंद्राची तातडीची बैठक | विमानसेवांवर बंदीची शक्यता

Coronavirus, strain in United Kingdom, Air Travel ban

नवी दिल्ली, २१ डिसेंबर: भारतात ब्रिटनमधून येणाऱ्या विमानसेवांवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूनचे नवे रुप समोर आले आहे. या रुपातील विषाणू वेगाने पसरत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. इंग्लंडचे मुख्य चिकित्सा अधिकारी क्रिस व्हिटी यांनी शनिवारी याला दुजोरा दिला आहे. कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे (Coronavirus Strain) नेदरलँड, बेल्जियम, इटली आणि जर्मनीने यूकेमधून येणाऱ्या विमानसेवांवर बंदी घातली आहे.

ब्रिटनचे आरोग्य चिकित्सा अधिकारी क्रिस व्हिटी यांनी कोरोना विषाणूचे नवे रुप पहिल्या विषाणूपेक्षा वेगळे असेल, असं सांगितले. या विषाणूचा वेगाने संसर्ग होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक ठिकाणी अधिक काळजी घेण्याचे आवाहन क्रिस व्हिटी यांनी केले आहे. ब्रिटनने यापूर्वीच इतर देशांनी विमानसेवांवर बंदी घालण्याबाबत सुचवले होते.

ब्रिटनमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मात्र यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली होती. ब्रिटनमध्ये वाढणारी करोना रुग्णांची संख्या ही नवीन प्रकारच्या करोना विषाणूमुळे आहे. करोनाच्या या नव्या विषाणूमुळेच ब्रिटन आणि युरोपीयन देशांमध्ये पुन्हा करोनाबाधितांची संख्या वेगानं वाढू लागल्याचे सांगितलं जात आहे. हा करोनाचा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा वेगळा असल्याची माहिती समोर आल्यानंतर लंडन आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. दरम्यान, नेदरलँड आणि बेल्जिअमनं ब्रिटनमध्ये जाणाऱ्या आपल्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. तर दुसरीकडे इटलीदेखील विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याच्या विचारात आहे.

 

News English Summary: Airlines from Britain are likely to be banned in India. The Union Health Ministry has called an emergency meeting. A new version of the corona virus has emerged in Britain. The virus is thought to be spreading rapidly. England’s chief medical officer Chris Whitty confirmed this on Saturday. The Netherlands, Belgium, Italy and Germany have banned flights from the UK due to a new strain of the coronavirus.

News English Title: Coronavirus strain in United Kingdom Air Travel may be ban news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x