Police Alert | घरबसल्या मोबाईलवरून दिवसाला हजारो कमवा मेसेज | जर त्या लिंकवर..

मुंबई, २१ डिसेंबर: सध्या तंत्रज्ञान आणि फसवणूक हे एक समीकरण होऊ लागलं आहे. आज प्रत्येक हातात मोबाईल असतो आणि त्यावर समाज माध्यमांशी संबंधित अँप इंस्टाल असतात. त्यात रियलटाइम चॅटिंग अँप व्हाट्सअँप म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळे फसवणूक करण्याचा तो सोपा मार्ग झाला आहे. त्यात बेरोजगारी वाढू लागल्याने सामान्यांना देखील अधिक मार्गाने पैसे कमविण्याचे मार्ग शोधावे लागतात. नेमका त्याचाच फायदा घेऊन काही हॅकर्स लिंक तयार करून व्हाट्सअँप वर एका मेसेजच्या मार्फत पाठवून अनेकांची फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे. अशा अफवांना लोकांनी बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
काय आहे हा मेसेज:
संबंधित मेसेजमध्ये एक पार्ट टाइम नोकरी करण्याची संधी चालून आली आहे असा दावा करण्यात आलाय. या माध्यमातून दिवसाला दोनशे ते तीन हजार रुपयांपर्यंत कमाई करता येईल. दिवसातून केवळ १० ते ३० मिनिटं काम करावं लागेल. खालील लिंकवर क्लिक करुन नाव नोंदवा. नाव नोंदवल्यानंतर तुम्हाला ५० रुपये मिळतील, असं सांगून खाली एक लिंक दिलेली असते.
परंतु हा फसवणुकीचा प्रकार असून नागरिकांनी याला बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमधील सायबर गुन्हे विभागाच्या पोलीस उपायुक्त (डीसीपी) रश्मी करंदीकर यांनी हा मेसेज म्हणजे फसवणुकीचा प्रकार असल्याची माहिती लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना दिली. नागरिकांनी या लिंकवर क्लिक करु नये असं आवाहनही करंदीकर यांनी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून नागरिकांना केलं आहे.
News English Summary: Nowadays, technology and fraud are becoming an equation. Today, every hand has a mobile and social media related amps are installed on it. Realtime chatting app WhatsApp has become an integral part of everyone’s life. So it has become an easy way to cheat. As unemployment rises, ordinary people also have to find ways to make more money. It has come to light that some hackers are taking advantage of this and creating links and sending a message on WhatsApp to deceive many. Police have appealed to the people not to fall prey to such rumors.
News English Title: Suspicious Links on Whatsapp alert by Mumbai Police Cyber Crime news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY