६ वर्षांपूर्वी स्वतः काय बोलले त्याचा विसर | पण मनमोहनसिंग यांचं १४ वर्षांपूर्वीच अजून लक्षात?
नवी दिल्ली, २२ डिसेंबर: अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या ग्रंथालयात कुराणही आहे आणि गीता-रामायणाचा अनुवादही आहे. एक भारत, श्रेष्ठ भारतचं हे विद्यापीठातील चित्रं अत्यंत चांगलं आहे, असं सांगतानाच अलिगड मुस्लिम विद्यापीठात मिनी इंडियाच पाहायला मिळतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएमयूचा गौरव केला. यावेळी त्यांनी सबका साथ सबका विकासचा नारा देतानाच भारताच्या जडणघडणीत मुस्लिम स्कॉलर आणि एएमयूचं मोठं योगदान असल्याचंही स्पष्ट केलं. (Prime Minister Narenda Modi addresses centenary celebrations of AMU today)
अलीगड मुस्लिम विद्यापीठाला आज 100 वर्षे पूर्ण झाले आहेत. विद्यापीठाच्या या शताब्दी समारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करत होते. यावेळी त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापाठीच्या शैक्षणिक कार्याची मुक्तकंठाने स्तुती केली. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या १४ वर्षांपूर्वीच्या विधानाला अप्रत्यक्ष प्रत्युत्तर दिलं.
जे देशाचं आहे, ते देशातल्या प्रत्येक नागरिकाचं आहे, असं मोदी म्हणाले. मोदींनी या विधानातून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिल्याचं म्हटलं जात आहे. देशातल्या संसाधनांवर सर्वप्रथम अल्पसंख्यांकांचा अधिकार असल्याचं मनमोहन सिंग यांनी १४ वर्षांपूर्वी म्हटलं होतं. स्वच्छ भारत मिशनमुळे शालेय शिक्षण अर्ध्यावर सोडणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनींचं प्रमाण ७० टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर आल्याचं ते पुढे म्हणाले.
वास्तविक ६ वर्षांपूर्वी म्हणजे सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदी बरंच काही बोलले होते आणि त्यामुळे त्यांना सत्ता प्राप्त झाली होती. आज त्यांना त्यातील कोणत्याही प्रश्नावर उत्तर देताना देशाने ६ वर्ष तरी पाहिलं नाही. किंबहुना ते त्यांना आठवतही नसावं, मात्र विरोधकांची १५-२० वर्षांपूर्वीची विधानं आजही त्यांच्या उत्तर प्रकारे लक्षात असून संधी मिळताच ते त्याची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आठवण करून देतात.
News English Summary: The library of Aligarh Muslim University also has a Quran and a translation of the Gita-Ramayana. Prime Minister Narendra Modi lauded AMU, saying that the picture of one India, one great India in the university is very good, only Mini India can be seen in Aligarh Muslim University. While chanting the slogan of ‘Sabka Saath Sabka Vikas’, he also clarified that Muslim Scholars and AMU have made a great contribution to the development of India.
News English Title: PM Narendra Modi indirectly replies Dr Manmohan Singh over his statement about minorities news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार