सानप यांच्या येण्याने शिवसेनेला काहीच फायदा झाला नव्हता | मग नुकसानीचा प्रश्नच कुठे
नाशिक, २२ डिसेंबर: शिवसेनेतून भारतीय जनता पक्षात घरवापसी करणाऱ्या बाळासाहेब सानप (Former MLA Balasaheb Sanap) यांचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक शैलीत समाचार घेतला. बाळासाहेब सानप यांच्या जाण्यामुळे शिवसेनेचे नुकसान झाले का, असे संजय राऊत यांना विचारण्यात आले. त्यावर संजय राऊत यांनी तितक्याच हजरजबाबीपणे उत्तर देत बाळासाहेब सानप यांनी खिल्ली उडविली. बाळासाहेब सानप यांच्या येण्याने शिवसेनेला कोणताही फायदा झाला नव्हता. त्यामुळे नुकसानीचा प्रश्नच नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.
दरम्यान, नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप यांचा फायदा होऊ शकत असल्याने भारतीय जनता पक्षानेही सानप यांना पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, दोन वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याला पक्षात प्रवेश कशासाठी दिला जात आहे? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या एका गटातून उपस्थित होत आहे. सानप हे आज पक्षात येतील आणि महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनी पक्ष बदलला तर? असा सवालही भारतीय जनता पक्षामधील या गटाकडून विचारला जात आहे. पण सानपांच्या पक्षप्रवेशानंतर आता भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, अनेक नाराज नगरसेवक भाजपला रामराम ठोकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या विरोधापेक्षा पक्षातील विरोध आमदार सानप यांच्यासाठी अडचणीचे ठरले होते. सानप यांच्याविरुद्ध पक्षातील इच्छुकांचा एक मोठा गट त्यावेळी सक्रीय झाला होता, त्यांच्याकडून सानप यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध झाला होता. विशेष म्हणजे सानप यांना उमेदवारी देऊ नयेत म्हणून पक्षातील काही नेत्यांनी गिरीश महाजन यांची त्यावेळी भेट घेतली होती.
मागील पाच वर्षात भाजप पक्षातील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना संधी न देता बाहेरील मंडळींच्या हातात नाशिकची सत्ता देण्यात आल्याचा आरोप सुद्धा त्यावेळी करण्यात आला होता. नाशिक पूर्व मतदारसंघात उमेदवार बदलण्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून भाजपच्या गटात सुरु होती. परिणामी भाजपने स्थानिक नेत्यांच्या दबावाखाली तत्कालीन आमदार सानप यांना तिकीट नाकारलं आणि बाळासाहेब सानप यांच्या राजकीय प्रवासाला उतरती कळा लागली होती. तेच चक्र आता पुन्हा सुरु झालं आहे.
News English Summary: Former MLA Balasaheb Sanap, who is returning home from Shiv Sena to Bharatiya Janata Party, was reported by Shiv Sena MP Sanjay Raut. Sanjay Raut was asked whether the Shiv Sena suffered due to the departure of Balasaheb Sanap. Balasaheb Sanap scoffed at Sanjay Raut’s equally sarcastic reply. Shiv Sena did not benefit from the arrival of Balasaheb Sanap. Therefore, there is no question of loss, said Sanjay Raut.
News English Title: Shivsena MP Sanjay Raut reaction over Balasaheb Sanap joining BJP again news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार