मेट्रो ३ | शापूरजी पालनजीकडून भाजपला निवडणूक फंडिंग | म्हणून कांजूरमार्ग प्लॉटवर?..
मुंबई, २३ डिसेंबर: कांजूरमार्ग येथील जमीन जर केंद्र सरकारच्या मालकीची असेल तर मग फडणवीस सरकारने या जागेवर एक लाख घरे बांधण्याचा शापूरजी पालनजी या बांधकाम व्यावसायिक फर्मचा प्रस्ताव कसा स्वीकारला होता, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
फडणवीस सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडकरिता निर्धारित असलेल्या जमिनीवर ११ जून २०१९ रोजी केंद्र सरकारच्या ‘हाउसिंग फॉर ऑल २०२२’ या उद्दिष्टाकरिता एक लाख परवडणाऱ्या घरांचा शापूरजी पालनजी या बांधकाम व्यावसायिकाने दिलेला प्रस्ताव स्वीकारून त्यावर अप्पर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठीत केली होती. या जमिनीवर गरोडिया या बिल्डरचा संबंध प्रश्नांकित असल्याने शापूरजी पालनजी यांच्याबरोबर गरोडियाने केलेला करार उच्च न्यायालयाने २०१६ साली रद्दबातल ठरवला होता. त्यामुळे सदर जमिनीवरील शापूरजी पालनजी यांचा संबंध नाही याचा विचार न करता फडणवीस सरकारने हा प्रस्ताव स्वीकारला कसा? तत्कालीन सरकार यातून काय व्यावसायिक हितसंबंध प्रस्थापित करणार होते? असे सवाल सावंत यांनी केले आहेत.
मात्र त्यानंतर एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. मेट्रो ३ प्रकल्पाच्या अनुषंगाने जो कांजूरमार्गचा प्लॉट प्रकाश झोतात आला आहे त्यावरून भाजप एवढं आक्रमक का झालं आहे आणि भाजपचे शापूरजी पालनजी या बांधकाम व्यावसायिका एवढे कोणते घनिष्ट संबंध आहेत ते समोर आलं आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचं नाव पुढे करण्यापूर्वी भाजपने मोठ्या उद्योगांकडून प्रचंड प्रमाणात निवडणूक फंड जमा केला होता. त्यातील अनेकांना सत्ता आल्यानंतर मोठं मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. शापूरजी पालनजी ही बांधकाम व्यवसायातील कंपनी देखील त्यापैकीच एक म्हणावी लागेल.
उदाहरण द्यायचे झाल्यास फडणवीस सरकारने तब्बल ७८३ कोटींचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला होता जो मूळ किमतीच्या म्हणजे ६२२ कोटी पेक्षा २६ टक्क्याने अधिक होता.
त्यानंतर फडणवीस सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडकरिता निर्धारित असलेल्या जमिनीवर ११ जून २०१९ रोजी केंद्र सरकारच्या ‘हाउसिंग फॉर ऑल २०२२’ या उद्दिष्टाकरिता एक लाख परवडणाऱ्या घरांचा शापूरजी पालनजी या बांधकाम व्यावसायिकाने दिलेला प्रस्ताव स्वीकारून त्यावर अप्पर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठीत केली होती हा योगायोग नव्हता.
याच शापूरजी पालनजी बांधकाम व्यावसायिक कंपनीकडून भाजपाला २०१४-१५ या वर्षासाठी १ कोटी ५० लाखाचा निवडणूक फंड मिळाला होता. याच बांधकाम व्यावसायिक कंपनीला केंद्रातील अनेक रेल्वे संबंधित कॉन्ट्रॅक्ट देखील मिळाले आहेत हे विशेष म्हणावे लागेल. बांधकाम व्यावसायिक कंपनीने भाजपाला दिलेल्या निवडणूक फंडाची माहिती देणाऱ्या myneta.info वर देखील पाहू शकता. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स देशातील राजकीय पक्षांची माहिती RTI मार्फत मागवून ती वेळोवेळो अपडेट्स करत असतात. त्यामुळे भाजपाची आक्रमकता ही विकासासाठी आहे की देणगीदारांसाठी ते समजू शकतं.
News English Summary: The BJP had received an election fund of 1 crore 50 lakhs rupees for the year 2014-15 from Shapoorji Palanji Construction Company. It is noteworthy that the same construction company has also won several railway related contracts at the Center. You can also see the election fund given to the BJP by the construction company on myneta.info. The Association for Democratic Reforms updates the political parties of the country from time to time by requesting information through RTI. So the BJP’s aggression is for development that donors can understand.
News English Title: Shapoorji Pallonji company was given election fund to BJP in 2014 15 news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार