ज्याअर्थी देशातील शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे | त्याअर्थी देश खूप मागे चालला आहे
पिंपरी-चिंचवड, २३ डिसेंबर: नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन अजुनही सुरूच आहे. तीनही कायदे रद्द करा अशी शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे. याच मुद्यांवर शेतकरी संघटना अडून बसल्या आहेत. तर कायदे रद्द होणार नाहीत अशा भूमिकेवर सरकार ठाम आहे. त्यामुळे हा पेच कसा सुटणार असा सवाल आता विचारला जातोय. आतापर्यंतच्या चर्चेच्या फेऱ्यांमधून फार काहीच निघालं नाही. त्यानंतरही पुन्हा एकदा ही चर्चा सुरू व्हावी यासाठी सरकारला प्रयत्न आहे.
दरम्यान मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी आंदोलनावर भाष्य करताना रोखठोक मत माडलं आहे. सयाजी शिंदे पिंपरी-चिंचवडच्या पालिका आयुक्तांसोबतच्या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना आंतरराष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमित्ताने शेतकरी आंदोलनाबाबत विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी दाक्षिणत्या चित्रपटातील एक डायलॉग ऐकवा. एक देश मागे गेला म्हणजे या देशातील शेतकरी मागे गेला असं यावेळी ते म्हणाले.
त्यांनी सांगितलं की, “एक देश मागे गेला म्हणजे या देशातील शेतकरी मागे गेला. देश पुढे गेला म्हणजे एक शेतकरी पुढे गेला. ज्याअर्थी आपल्या देशातील शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे त्याअर्थी देश खूप मागे चालला आहे. आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. शेतकरी पुढे गेला तरच देश पुढे गेला हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे”.
News English Summary: Marathi actor Sayaji Shinde, while commenting on the agitation, has given a strong opinion. He said, “One country went backwards, so the farmers of this country went backwards. As the country moved forward, so did a farmer. In the sense that the farmers of our country are in such a state, the country is far behind. We should all stand behind the farmers. Everyone should understand that the country moves forward only if the farmers move forward ”.
News English Title: Film actor Sayaji Shinde react over farmers protest news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार