23 November 2024 7:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

राष्ट्रवादीचे पारनेरचे आ. निलेश लंकेंच्या नैत्रुत्वात आत्तापर्यंत 30 ग्राम पंचायती बिनविरोध

NCP Parner MLA Nilesh Lanke, big success, gram panchayats

पारनेर, २४ डिसेंबर: महाराष्ट्रातील तब्बल १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला होता. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १८ जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली होती.

एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण १४,२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीनं राबविणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं होते. कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्यानं मार्च २०२० मध्ये सुमारे १५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोग्याच्या आदेशानुसार १७ मार्च २०२०ला स्थगित करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हाव्या यासाठी आव्हान केलं होतं. त्यानुसार त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. त्यांच्या हटके ऑफरनंतर आता अनेक ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होणार आहे. प्रसार माध्यमाच्या हाती आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तब्बल 30 ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर आणखी 10 ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण 40 ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक लढणार आहेत.

राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. कोरोनाच्या संकटात या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यातील निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अनोखी शक्कल लढवली होती. गावांमधील निवडणुका बिनविरोध पार पाडा आणि 25 लाखांचा विकास निधी मिळवा, अशी घोषणाच निलेश लंके यांनी केली होती. बिनविरोध निवडणुका करून शासनाचा खर्च वाचवण्यासाठी त्यांनी ही शक्कल लढवली होती. त्यामुळे यावर बैठक घेत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

 

News English Summary: NCP MLA Nilesh Lanka had challenged the Gram Panchayat elections in Parner taluka to be held without any opposition. Accordingly, their efforts have met with success. Following his stubborn offer, many Gram Panchayat elections will now be held without any opposition. According to sources, so far 30 Gram Panchayats have been decided unopposed. It is hoped that 10 more Gram Panchayats will be formed without any objection. Therefore, a total of 40 Gram Panchayats will contest the elections unopposed.

News English Title: NCP Parner MLA Nilesh Lanke big success 30 gram panchayats are unopposed in election news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x