22 November 2024 11:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Health First | कोथिंबीर खाण्याचे फायदे माहित आहे का? | नक्की वाचा

Benefits, Coriander leaves, health article

मुंबई, २४ डिसेंबर: पालेभाज्यांचा वापर आपण रोजच्या आहारामध्ये आवर्जून करतो. कोथिंबीरचा वापर हा वेगवेगळ्या चटण्यांमध्ये केला जातो, त्यामुऴे पदार्थांचा स्वाद वाढण्यास मदत होते. कोथिंबीरमध्ये विविध प्रकारचे गुणधर्म आहेत. कॅल्शिअम, पोटॅशियम, विटॅमिन्स आणि मॅंगनीज यांच प्रमाण कोथिंबीरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ते आरोग्यासाठी लाभदायक आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोथिंबीरचे फायदे.

हिरवी कोथिंबीरची पानं आणि धने अर्थात याचे दाणे दोन्ही जेवणामध्ये स्वाद वाढवातात. जेवणामध्ये भलेही मिरची अथवा मसाला नसो पण तुम्ही कोथिंबीर आणि धन्याचा वापर केल्यास, तुमच्या जेवणाला उत्तम चव येते. पण तुम्हाला हे माहीत आहे का? या कोथिंबीरमध्ये अनेक गुण लपले आहेत. यामध्ये प्रोटीन, वसा, कार्बोहायड्रेट, फायबर आणि बऱ्याच प्रकारचे मिनरल्स असतात. याशिवाय कोथिंबीरमध्ये कॅल्शियम, आयर्न, थियामीन, पोटॅशियम, विटामिन सी, फॉस्फरस आणि कॅरोटीनदेखील असतं.

कोथिंबीरचे फायदे खालीलप्रमाणे:

  • कोथिंबीरच्या पानांमध्ये व्हिटॅमिन क, व्हिटॅमिन ब यांच प्रमाण भरपूर आहे, ज्यामुळे तुमचे शरिर स्वस्थ राहण्यासा मदत मिळते.
  • कोथिंबीरमध्ये फायबर आणि आर्यनचे प्रमाण अधिक असते, वजन कमी करण्यासाठी कोथिंबीर फायदेशीर ठरते.
  • कोथिंबीरच्या पानांमध्ये असलेल्या पोषक द्रव्यांमुळे रक्दाब नियंत्रणात राहतो.
  • मधुमेहींच्या रूग्णांसाठी कोथिंबीर अतिशय फायदेशीर आहे, त्यामुळे कोथिंबीरचा आहारात जरूर समावेश करा.
  • व्हिटॅमिन क च्या समावेशामुळे अल्जायमरसारखे आजार होण्याापासून कोथिंबीर रोखते.

मधुमेहसाठी कोथिंबीरचा फायदा (Diabetes):

मधुमेहग्रस्त रोग्यांसाठी कोथिंबीर खूपच उपयुक्त आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी कोथिंबीरचा चांगला उपयोग होतो. शरीरामधील मेटाबॉलिजमदेखील योग्य तऱ्हेने होतं. कोथिंबीर रक्तातील साखरेची पातळी अतिशय जलद गतीने कमी करते.

 

News English Summary: Both green cilantro leaves and coriander seeds enhance the flavor of the meal. Even though there is no chilli or spice in the meal, if you use cilantro and coriander, your meal will taste better. But did you know that? There are many qualities hidden in this cilantro. It contains proteins, fats, carbohydrates, fiber and many minerals. In addition, cilantro contains calcium, iron, thiamine, potassium, vitamin C, phosphorus and carotene.

News English Title: Benefits of eating coriander leaves health article updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x