22 November 2024 12:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

रामाला मानणारे वचन कसे मोडतात | अण्णांचा मोदी सरकारला संतप्त सवाल

Anna Hajare, Modi government, Farmers Protest

राळेगणसिद्धी, २६ डिसेंबर: देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली होती. यावेळी गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांच्य मनधरणीचा प्रयत्न केले होते. विशेष म्हणजे अण्णा देखील भाजप नेत्यांना गरजेपेक्षा अधिक वेळ देत असल्याचं पाहायला मिळत होतं .

कारण काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. तसे पत्रही अण्णांनी केंद्र सरकारला पाठवले होते. यापूर्वी 21 तारखेला माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि खासदार भागवत कराड यांनी देखील अण्णांची भेट घेऊन मनधरणी केली होती. त्यानंतर आता गिरीश महाजनही अण्णा हजारे यांना भेटायला आले होते.

तत्पूर्वी म्हणजे 30 जानेवारी 2019 रोजी अण्णांनी केलेले उपोषण सोडण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गिरीश महाजनही अण्णा हजारे यांच्याकडे आले होते. यावेळी अण्णांना आश्वासन देण्यात होते. परंतु, अद्यापही अण्णांच्या मागण्या मान्य न झाल्याने अण्णांनी नव्याने आंदोलनाचा इशारा दिला. अण्णांनी केलेल्या मागण्या रास्त असून केंद्र सरकारही त्याच मार्गाने जात असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. तसेच अण्णा हजारे यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.

दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. एका बाजूला रामाचे नाव घेऊन राज्य करायचे आणि दुसरीकडे प्रभू राम यांचा आदर्श बाजूला सारून दिलेली वचने पाळायची नाहीत, असा या सरकारचा कारभार सुरू असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नी आपण केलेल्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी हजारे यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. तसेच सध्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनापेक्षा आपल्या मागण्या वेगळ्या असून त्या आंदोलनावर आपले आंदोलन अवलंबून नसल्याचे संकेतही हजारे यांनी दिले आहेत.

कृषिमूल्य आयोगाला संवैधानिक दर्जा देणे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारणे यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा हजारे यांनी दिला आहे. हजारे यांचे हे आंदोलन दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून असल्याचे मानले जात होते. मात्र, ‘अण्णांचे हे आंदोलन दिल्लीतील शेतकरी आंदोलनापेक्षा वेगळे असून आपल्या जुन्याच मागण्यांसाठी त्यांचे हे समांतर आंदोलन असेल,’ असे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने पूर्वीच प्रकाशित केले होते. त्याला आता खुद्द हजारे यांच्याकडूनच दुजोरा मिळत आहेत. प्रसार माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली आहे.

 

News English Summary: Senior social activist Anna Hazare has targeted the BJP government. Hazare has said that the government is trying to rule in the name of Rama on the one hand and on the other hand, it does not want to keep the promises made by Lord Rama. Hazare has given the government one month to decide on the demands of the farmers. Hazare also hinted that his demands were different from the ongoing agitation in Delhi and that his agitation was not dependent on that agitation.

News English Title: Anna Hajare criticized Modi government over breaking own promises news updates.

हॅशटॅग्स

#Anna Hajare(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x