22 November 2024 8:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

मोदी सरकारचा फंडिंगसाठी हातभार | काल शेतकऱ्यांना पाठविलेले पैसे आंदोलनासाठी दान

Modi government, funding, farmer protest, Punjab farmers

चंदीगड, २६ डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण आणि कृषी मंत्रालयाच्या सचिवांनी पाठवलेल्या चिठ्ठीनंतर, रणनीती ठरवण्यासाठी शनिवारी किसान संयुक्त मोर्चाने बैठकीचं आयोजन केलं आहे. पंतप्रधानांनी किसान सन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण केलं. यावेळी मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिल्लीतील आंदोलनावर भाष्य केलं. “काही राजकीय पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. कोणतेही मुद्दे असतील तर चर्चेला या, मात्र माथी भडकवू नका” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता वितरित केला. त्यानुसार 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी ट्रान्सफर करण्यात आले. त्यावेळी मोदी म्हणाले, ‘शेतकऱ्यांना बदनाम करण्याची राजकारण होत आहे. आधीच्या सरकारांमुळे शेतकऱ्यांप्रती धोरणचं ठरलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं वाटोळ झालं’ असं मोदी भाषणात म्हणाले होते.

मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनाला फंडिंग होतं असल्याचा आरोप यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी केला होता. आता शेतकरी म्हणत आहेत की मोदींमुळेच आम्हाला अजून फाडनिंग मिळतंय. पंतप्रधानांनी हा पैसा आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पाठविला आहे. पंजाबच्या सियालका गावात राहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये आले आहेत. या गावातील शेतकरी बलविंदर सिंह यांचे म्हणणे आहे की, सरकार आमच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. मात्र, तेच फंडिंग करत आहेत. जे पैसे मोदी यांनी आम्हाला पाठविले आहेत ते आम्ही आंदोलनासाठी दान करणार आहोत.

अन्य एका शेतकरी जसपाल सिंह यांनी सांगितले की, जे लोक आंदोलनासाठी फंडिंग कोण करते यावर प्रश्न विचारत आहेत, त्यांना आम्ही हे सांगू इच्छितो की पंजाबचे शेतकरी घराघरात जाऊन आंदोलनासाठी समर्थन मागत आहेत. लोक त्यांच्या इच्छाशक्तीनुसार पन्नास ते ५ हजार रुपये दान करत आहेत. या पैशांतून आवश्यक साहित्य खरेदी करून ते दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांना पाठविले जात आहे. आमची लढाई सरकारविरोधात आहे, या पैशांचा वापर आम्ही आमच्यासाठी करणार नाही. हे पैसे आम्ही आंदोलनासाठी देणार.

 

News English Summary: Authorities had earlier alleged that the farmers’ movement was being funded. Now the farmers are saying that it is because of Modi that we are getting more fading. The Prime Minister has sent the money to help the agitating farmers. Many farmers living in Sialka village in Punjab have Rs 2,000 in their accounts. Balwinder Singh, a farmer from this village, says that the government is questioning our movement. However, they are doing the same funding. We will donate the money sent by Modi for the agitation.

News English Title: Modi government funding farmer protest allegations said Punjab farmers news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x