28 April 2025 12:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | मायनिंग कंपनी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE e Filing Income Tax | पगारदारांनो, नवीन टॅक्स प्रणालीमध्ये 75000 रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन मिळणार नाही? मोठी अपडेट LIC Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या सरकारी फंडात, अनेक पटीने पैसा परतावा मिळतोय, सेव्ह करून ठेवा
x

शिवसेनेशिवाय निवडणूक स्वबळावर जिंकणं शक्य: फडणवीस

मुंबई : आम्ही यापुढे शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न करू परंतु त्याआधी शिवसेनेशिवाय निवडणूक स्वबळावर जिंकणं शक्य आहे हे पालघर लोकसभा निवडणुकीत सिद्ध झालं आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं असून पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईत आज भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी पालघर पोटनिवडणुकीचा हवाला देत शिवसेनेशिवाय निवडणूक स्वबळावर जिंकणं शक्य आहे असा आत्मविश्वास व्यक्त केला.

भाजप नैतृत्व शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न करेल परंतु तसे न झाल्यास शिवसेना भाजपसोबत असो, वा नसो पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागा, अशी थेट सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सुद्धा समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे असं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे भाजप सुद्धा आगामी निवडणुकीसाठी कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या