25 November 2024 2:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
x

राहुल गांधींच्या आजींची प्रकृती चिंताजनक | त्यामुळे तातडीने इटलीला गेले

Rahul Gandhi's grandmother, health is critical, Congress MP Rajiv Satav

नवी दिल्ली, २८ डिसेंबर: दिल्लीतील शेतकरी आंदोलन ऐन भरात असताना परदेशात गेल्यामुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या टीकेचे धनी होत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी राहुल यांची बाजू मांडली आहे. राहुल गांधी यांची आजी आजारी आहे. तिला भेटण्यासाठी राहुल गांधी इटलीला गेल्याचे राजीव सातव यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांची आजी आजारी आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं राहुल गांधी देशाबाहेर गेले आहेत. आपल्या घरातील एखादी व्यक्ती, नातेवाईक आजारी असल्यास आपण सर्व काही सोडून त्यांच्यासाठी धावून जातो, असं राजीव सातव यांनी सांगितलं.

एकीकडे दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना राहुल गांधी परदेशात गेल्याचं भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात. पण पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसोबत चर्चा करत नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाताहत झाली आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पण तरीही मोदी याबद्दल चकार शब्द काढत नाहीत,’ अशा शब्दांत सातव यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.

 

News English Summary: Former Congress president Rahul Gandhi is currently facing criticism for going abroad during the Delhi farmers’ agitation. Against this backdrop, Congress MP Rajiv Satav has sided with Rahul. Rahul Gandhi’s grandmother is ill. Rajiv Satav clarified that Rahul Gandhi had gone to Italy to meet her.

News English Title: Rahul Gandhis grandmother health is critical says congress MP Rajiv Satav News updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x