22 November 2024 3:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON
x

बाईंच्या डोक्यावर अपघात झालाय भाऊ | माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभं राहिल्यानंतर म्हणाली

Shivsena leader Urmila Matondkar, Kangana Ranaut

मुंबई, २९ डिसेंबर: मागील काही दिवसांपासून शिवसेनेसोबतच्या वादामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या अभिनेत्री कंगना रनौत हिने मंगळवारी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी कंगना हिरवी साडी, नाकात नथ आणि केसात माळलेला गजरा अशा पारंपारिक मराठमोठ्या वेषात आली होती. (Bollywood actress Kangana Ranaut visit Siddhivinayak temple in Mumbai)

सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर कंगना रानौतने मोठ्या उत्साहात हसतखेळत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असे सांगत कंगनाने शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला. यावेळी प्रसारमाध्यमांनी तिला संजय राऊत यांच्या पत्नीला आलेल्या ईडीच्या नोटीसविषयी विचारणा केली. तुम्हाला मुंबईत परवानगी नाकारणाऱ्यांना ईडीची नोटीस आली त्याबद्दल काय वाटते, असे कंगनाला विचारण्यात आले. मात्र, कंगना रानौतने त्यावर बोलायचे टाळले. (After visiting Siddhivinayak, Kangana Ranaut laughed and interacted with the media)

मंदिराबाहेर येताच कंगना रणौतने ‘जय महाराष्ट्र’ घोषणा दिली. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना ती म्हणाली की, “मला मुंबईत राहण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही. फक्त गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि परवानगी हवी आहे. ती मिळाली आहे. अजून कोणाकडे मी परवानगी मागितलेली नाही”.

कंगनाने ट्विटरला सिद्धिविनायक मंदिराबाहेर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने म्हटलं आहे की, “माझ्या लाडक्या मुंबई शहरासाठी उभं राहिल्यानंतर शत्रुत्वाचं प्रमाण आश्चर्यचकित करणारं होतं. आज मी मुंबादेवी आणि सिद्धिविनायक मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला. मला सुरक्षित आणि स्वागत केल्यासारखं वाटत आहे”.

दरम्यान, कंगनाने बोलताना ‘माझ्या लाडक्या मुंबई शहरासाठी उभं राहिल्यानंतर शत्रुत्वाचं प्रमाण आश्चर्यचकित करणारं होतं’ असं म्हटल्याने शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाचं नाव न घेता तिची खिल्ली उडवली आहे. या संदर्भात ट्विट करताना तिने म्हटलं की, ‘माझ्या लाडक्या मुंबई शहरासाठी उभं राहिल्यानंतर……बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ…

 

News English Summary: Shiv Sena leader Urmila Matondkar has ridiculed Kangana without mentioning her name, saying that the level of hostility was astonishing after she stood up for the city of Mumbai. In this context, while tweeting, she said, ‘After standing up for my beloved Mumbai city …… has there been an accident on the left head, brother?

News English Title: Shivsena leader Urmila Matondkar slams Kangana Ranaut over her statement about Mumbai news updates.

हॅशटॅग्स

#filmy(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x