29 April 2025 8:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 30 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL Ashok Leyland Share Price | ऑटो कंपनीचा मल्टिबॅगर स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: ASHOKLEY
x

स्वतः शरद पवार निरंजन डावखरेंविरोधात आक्रमक

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार स्वतः निरंजन डावखरेंविरोधात मैदानात उतरले आहेत. निरंजन डावखरेंविरोधात राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाल्याचे चित्र आहे. विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत निरंजन डावखरेंना धडा शिकवायचाच असा निर्धार राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला आहे.

आता स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचे ठरविल्याने राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जोमाने कामाला लागले आहेत. राष्ट्रवादीने निरंजन डावखरेंविरोधात एनसीपीचे ठाण्याचे नगरसेवक नजीब मुल्ला यांना मैदानात उतरविले आहे.

स्वतः शरद पवार यांनी त्यासंदर्भात रणनीती ठरविण्यासाठी बुधवारी पक्षाची बैठक आयोजित केली आहे. पवार त्यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. सकाळी ११ वाजता नवी मुंबईतील विष्णुदास भावे सभागृहामध्ये पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली असून त्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड यांच्या सहित राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या