22 November 2024 10:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

मुंबईत रात्री 11 नंतरही फूड डिलिव्हरीला परवानगी | महापालिकेची माहिती

Food home, delivery hotel, parcel counter, 31st December

मुंबई, ३१ डिसेंबर: आज संध्याकाळपासून थर्टी फर्स्ट पार्ट्यांना उधाण येईल. नववर्ष स्वागताची जय्यत तयारी सर्वत्र सुरु होईल. मात्र दरवर्षी प्रमाणे यंदा जोरदार सेलिब्रेशन करता येणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. कोविड-19 चे संकट आणि त्यामुळे सरकार, पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेले नियम पाळणे अनिवार्य आहे. दरम्यान, नाईट कर्फ्यू असला तरी मुंबईकरांची पार्टी थांबू नये म्हणून पालिकेने चोख व्यवस्था केली आहे. रात्री 11 नंतरही फूड डिलिव्हरी करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती बीएमसीने ट्विटद्वारे दिली आहे. हा निर्णय मुंबईकरांसाठी नक्कीच दिलासादायक आहे.

मुंबईत 5 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लागू आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टाँरंट आणि बार रात्री 11 वाजता बंद करावे लागतील. मात्र, लोकांच्या सुविधेसाठी हॉटेल्सची किचन आणि होम डिलेव्हरी रात्री दीडपर्यंत सुरु राहील.

दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या या निर्णयबाद्दल ‘आहार’चे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, किमान मुदतवाढ देण्याबाबत आपला मुद्दा विचारात घेतल्यानंतर आम्ही शेवटच्या क्षणी झालेल्या या घोषणेवर खुश आहोत. आम्ही आमच्या सदस्यांना रात्रीच्या कर्फ्यू दरम्यान आमच्या ऑपरेशन्सवर नियंत्रण ठेवत असलेल्या सर्व नियम आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगू. फक्त आमची विनंती आहे, की जे लोक आपले पैसे घेऊन घरी येतील त्यांना आणि होम डिलिव्हरीमध्ये सामील झालेल्या कर्मचार्‍यांना त्रास होऊ नये.

 

News English Summary: Thirty first parties will be pouring in from this evening. Preparations for the New Year’s reception will begin everywhere. However, it is now clear that the celebrations will not be as vigorous as every year. The crisis of Kovid-19 and therefore the rules laid down by the government and the police administration must be followed. Meanwhile, despite the night curfew, the corporation has made arrangements so that the party of Mumbaikars does not stop. Food delivery was allowed even after 11pm, BMC tweeted. This decision is definitely heartening for Mumbaikars.

News English Title: Food home delivery hotel parcel counter will remain open till 1 30 PM in Mumbai on 31st December news updates.

हॅशटॅग्स

#BMC(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x