12 December 2024 10:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

सेना-भाजपच्या राजकारणाने राज ठाकरेंवरचा विश्वास द्विगुणित ?

मुंबई : २०१४ मधील निवडणुकीत भाजप शिवसेनेने प्रचारादरम्यान एकमेकांवर तुफान चिखलफेक केली होती. मागील लोकसभेच्या निवडणूका असोत किंव्हा विधानसभेच्या निवडणुका, या दोन्ही पक्षांची आपसात भांडण करून प्रसार माध्यमांना स्वतःवर केंद्रित करण्याची रणनीती मतदाराला चांगलीच माहित झाली आहे. दोघे सुद्धा एकमेकांच्या पक्ष नैतृत्वाची भर सभेत वाटेल त्या थराला जाऊन उणीधुनी काढायचे आणि सत्तेचे मलई डोळ्यासमोर येताच पुन्हां ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्या वीणा करमेना’ अशी गत झाली होती.

निवडणुका संपताच आणि निकाल लागताच शिवसेना सत्तेत सहभागी झाली तसेच केंद्रात आणि राज्यात मंत्रिपद सुद्धा घेतली. परंतु शिवसेनेने सत्तेचा संपूर्ण कार्यकाळ हा केवळ राजीनामा नाट्यात व्यर्थ घालवला आहे. सत्तेच्या ४-५ वर्षात शिवसेनेच्या १२ मंत्र्यांनी राज्यात विकासाचे कोणते दिवे लावले ते सामान्य जनतेने चांगलेच अनुभवले आहे. जस भाजप चार वर्षात विकास कामांपेक्षा पक्ष विस्तारात अधिक गुंतला होता, तशीच शिवसेना पक्ष फुटी होऊ नये म्हणून सत्तेला खेटून आहे.

आता शिवसेनेचे १२ मंत्री सत्तेत येऊन कुचकामी ठरल्याने, मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असावा अशी स्वप्न पडू लागली आहेत. भाजपच्या सत्ताकाळाचा अनुभव आणि सामान्यांचा राग हा लोकसभा तसेच विधानसभा पोटनिवडणुकीत समोर आला आहे. त्याच सामान्यांच्या रागाची प्रचिती सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला सुद्धा येणार असल्याची चुणूक लागल्याने, सत्तेत राहून भाजपला विरोध करण्याच राजकारण सुरु आहे आणि त्यातून स्वतःला वेगळं भासविण्याचा प्रयत्नं शिवसेना करताना दिसत आहे.

कोणत्याही पक्षाने कितीही आव आणला तरी सामान्य मतदार शांतपने सर्व गोष्टींवर नजर ठेऊन असतो. तेच सध्या शिवसेनेच्या बाबतीत मराठी मतदार करताना दिसत आहे. २०१४ पूर्वी राज ठाकरेंबद्दल संभ्रम निर्माण करून मनसेला मत म्हणजे काँग्रेसला मत असं वातावरण जाणीवपूर्वक करण्यात आला होत आणि त्याचा त्यांना फायदा सुद्धा झाला होता.

परंतु शिवसेनेची मागील खेळी हळुवार पने त्यांच्यावरच सध्याचा सत्तेचा कार्यकाळ पाहता पलटताना दिसत आहे. शिवसेना नेहमी भाजप संदर्भात टोकाची भूमिका घेते आणि पुन्हां सत्तेसाठी त्यांनाच जाऊन मिळते. हा अनुभव लोकसभा, विधानसभा आणि सर्वच महत्वाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदाराला आला आहे. त्यामुळे मोदी विरोधी मत शिवसेनेला जाण्यापेक्षा ती अधिक राज ठाकरेंच्या मनसेकडे वळतील, कारण निवडणुकीनंतर शिवसेना पुन्हां भाजप बरोबरच संसार थाटते हे सर्वाना माहित झालं आहे. त्यात शिवसेनेने निवडणूक स्वतंत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ते आजही एनडीएचा घटक पक्ष आहेत.

त्यामुळे भाजप आणि सेनेमधील हा अनुभव पाहता आणि विशेष करून शिवसेनेने सत्तेत येऊन नक्की केलं तरी काय आणि सामान्य मराठी मतदाराच्या मतांचं ५ वर्षातील फलित तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सत्तेच्या कार्यकाळावर नाराज असलेली मराठी मत मोठ्याप्रमाणावर राज ठाकरेंच्या मनसेकडे वर्ग होतील आणि मोदींवर नाराज असलेला मराठी वर्ग सुद्धा शिवसेनेला मतदान करण्यापेक्षा तो मनसेला मतदान करण अधिक सोयीचं समजेल. कारण शिवसेनेने स्वतःच भाजपला मत म्हणजे शिवसेनेला मत अशी वातावरण निर्मिती करून ठेवली आहे.

त्यामुळे सत्तेत येण्याआधी आणि सत्तेत आल्यानंतर, स्वतःच पेरलेलं आज शिवसेनेवरच पलटण्याची वेळ आली आहे. इतकच नाही तर शिवसेनेने आगामी निवडणुकीच्या सभेतील प्रचारात पुन्हां राज ठाकरेनां लक्ष केल्यास, मनसे कुठे सत्तेत होती असा प्रश्न उपस्थित होऊन तुम्ही सत्तेत काय केलं त्याचा हिशेब द्या असं जर सामान्य मतदाराला वाटू लागलं तर परिस्थिती अजूनच कठीण होत जाईल. कारण मोदींवर किंव्हा भाजपवर टीका करून शिवसेना पुन्हा त्यांनाच सामील होते हे मतदाराने चांगलंच अनुभवलं आहे. त्यामुळे शिवसेनेचा केंद्रातील आणि राज्यातील सत्तेचा कार्यकाळ हा राज ठाकरेंवरील विश्वास द्विगुणित करत आहे असच काहीस चित्र आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x