19 April 2025 6:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Govt Alert | शेकडो कावळ्यांच्या मृत्यूची मालिका | बर्ड फ्ल्यूचा विषाणू आढळला

Fear of infectious, bird flu, virus found, Crows in Rajasthan

जयपूर, ०३ जानेवारी: राजस्थानमध्ये अचानक शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याहून चिंताजनक गोष्ट म्हणजे या कावळ्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’ या संसर्गजन्य आजाराचे विषाणू आढळून आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने काही राज्यांसाठी अत्यंत सावधगिरीचा इशारा दिला आहे.

राजस्थानच्या हाडौती भागात बर्ड फ्लूमुळे १०० हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. यात झालवाड जिल्ह्यात आतापर्यंत ९३ कावळे मृत्यूमुखी पडले आहेत. याशिवाय, कोटा जिल्ह्यातील रामगंजमंडीमध्ये ८, तर मथना गावात १९ कावळे मृत्यूमुखी पडल्याचं आढळून आलं आहे. आतापर्यंत कोटा, बारां, झालावाड, नागौर आणि जोधपूर जिल्ह्यांमध्ये मिळून ३०० कावळ्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

दरम्यान राजस्थानचे मुख्य सचिव कुंजीलाल मीना प्रसार माध्यमांना याबाबत माहिती देताना म्हणाले, ‘आत्तापर्यंत कोटा येथे ४७, झालवार येथे १०० तर बरान येथे ७२ कावळ्यांचा अचानक मृत्यू झाला आहे. बुंदी येथे एकाही कावळ्याच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आम्ही आवश्यक पावलं उचलतं असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार जनजागृती करत आहोत.’

 

News English Summary: Bird flu has killed more than 100 crows in Hadauti area of Rajasthan. So far 93 crows have died in Jhalwad district. Besides, 8 crows have been found dead in Ramganjmandi in Kota district and 19 in Mathana village. So far, a total of 300 crows have died in Kota, Baran, Jhalawar, Nagaur and Jodhpur districts.

News English Title: Fear of infectious disease again bird flu virus found in hundreds of crows in Rajasthan news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या