23 November 2024 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
x

बर्ड फ्लूचं संकट गडद | केरळमध्ये राज्यस्तरीय आपत्तीची घोषणा

Kerala, Bird Flu, State Disaster

तिरुवनन्तपुरम , ५ जानेवारी: कोरोनाच्या संकटातून संपूर्ण देश बाहेर पडत असताना आता आणखी एक नवं संकट उभं ठाकलं आहे. देशातील अनेक राज्यात बर्ड फ्ल्यूने डोकं वर काढलं आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि केरळात बर्ड फ्ल्यूने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे या राज्यांनी अॅलर्ट जारी केला असून केरळने तर बर्ड फ्ल्यूला राज्य आपत्ती म्हणून घोषित केलं आहे.

केरळमध्येही बर्ड फ्ल्यूचा कहर वाढल्याने हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. कोट्ट्यम आणि अलाप्पुझा जिल्ह्यात खासकरून बर्ड फ्ल्यूचा कहर वाढला आहे. बर्ड फ्लूचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या परिसरापासून एक किलोमीटर क्षेत्रातील बदक, कोंबड्या आणि पाळीव पक्ष्यांना मारण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. H5N8 व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागत असल्याची माहित अधिकाऱ्यांनी दिली. कोट्टायम जिल्ह्यातील नीदूर येथे बदक पालन केंद्रातील 1500 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूची साथ ही अत्यंत वेगाने पसरते. H5N8 व्हायरसमुळे पक्ष्यांच्या श्वसनयंत्रणेत बिघाड होऊन त्यांचा मृत्यू होता. माणसांनाही याची लागण होऊ शकते.

दरम्यान, केरळमधील कोट्टायम आणि अल्लपुझामधील थालावेद्या, इडथ्थावा, पालिपड आणि थाजाकारा पंचायतींच्या हद्दीमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झालेले पक्षी आढळू आलेत. या ठिकाणी राज्य सरकारने विशेष तुकड्या नियुक्त केल्या आहेत. या परिसराच्या एक किलोमीटर परिघातील सर्व ४८ हजार पक्षी ठार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पक्षांचा मोबदला देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल असंही के. राजू यांनी सांगितलं आहे.

तत्पूर्वी राजस्थानमध्ये अचानक शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. त्याहून चिंताजनक गोष्ट म्हणजे या कावळ्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’ या संसर्गजन्य आजाराचे विषाणू आढळून आले होते. त्यामुळे केंद्र सरकारने काही राज्यांसाठी अत्यंत सावधगिरीचा इशारा दिला होता.

राजस्थानच्या हाडौती भागात बर्ड फ्लूमुळे १०० हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला होता. यात झालवाड जिल्ह्यात आतापर्यंत ९३ कावळे मृत्यूमुखी पडले होते. याशिवाय, कोटा जिल्ह्यातील रामगंजमंडीमध्ये ८, तर मथना गावात १९ कावळे मृत्यूमुखी पडल्याचं आढळून आलं होतं. आतापर्यंत कोटा, बारां, झालावाड, नागौर आणि जोधपूर जिल्ह्यांमध्ये मिळून ३०० कावळ्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

 

News English Summary: As the entire country emerges from the Corona crisis, another crisis is looming. Bird flu has hit many states in the country. Bird flu has hit Rajasthan, Himachal Pradesh, Madhya Pradesh and Kerala. Therefore, these states have issued alerts and Kerala has declared bird flu as a state disaster.

News English Title: Kerala Declares Bird Flu As State Disaster 2 Districts On High Alert news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x