भातखळकर कालपासून खळ-खळ करतायत | तुम्ही गुजराती की मराठी माणसांचे? - हेमराज शहा

मुंबई, ६ जानेवारी: मुंबई महानगरपालिका शिवसेनेसाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत उच्च स्थानी असल्याने मुंबईची सत्ता स्वतःकडे ठेवण्यासाठी सर्वोच्च प्रयत्न करेल यात शंका नाही. त्यासाठी मराठी मतदारांपासून अमराठी मतदार देखील शिवसेनचं लक्ष आहेत. मराठी मतदार भाजपाकडे वर्ग होण्याची शक्यता कमी असून अमराठी मतदारांवरच त्याची राजकीय मदार असेल. शिवसेनासोबत नसल्याने भाजपाला मोठा राजकीय फटका बसणार यात शंका नाही. मात्र भाजपाची वोट बँक तोडण्यासाठी देखील शिवसेना तयारीला लागली आहे.
शिवसेनेने यासाठी अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातली आहे. एका बाजूला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.
दरम्यान शिवसेना देखील अमराठी मतांसाठी जोरदारपणे तयारीला लागली आहे. याचाच भाग म्हणून शिवसेनेकडून ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ मोहीम सुरु करण्यात आली आहे. शिवसेनेकडून गुजरातींसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याला ही अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शिवसेनेच्या या खेळीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली, त्यावर आता शिवसेनेने पलटवार केला आहे. गुजराती माणसाने उद्धव ठाकरे याना आपडा म्हटल्यावर भारतीय जनता पक्षाच्या अतुल भातखळकर यांचा तीळ पापडा झाला बहुतेक! ते कालपासून नुसता खळ खळ करतायत, अतुल भातखळकर तुम्ही नेमके कोणाचे? भारतीय जनता पक्षाला मत देणाऱ्या गुजराती माणसांचे की मराठी मातीत जन्मलेल्या मराठी माणसांचे? असा सवाल शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी विचारला आहे.
News English Summary: The Shiv Sena’s game was strongly criticised by the Bharatiya Janata Party, the Shiv Sena has now retaliated. When a Gujarati man called Uddhav Thackeray a disaster, Bharatiya Janata Party’s Atul Bhatkhalkar’s mole became a papada! They have been making a fuss for a long time, Atul Bhatkhalkar, who exactly are you? Gujarati people voting for Bharatiya Janata Party or Marathi people born in Marathi soil? This question has been asked by Shiv Sena’s national organiser Hemraj Shah.
News English Title: Shivsena Leader Hemraj Shah slams BJP MLA Atul Bhatkhalkar over Gujarati politics news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले या शेअरवर, जिओ फायनान्शिअल शेअरबाबत अपडेट नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | शेअरमध्ये जबरदस्त घसरगुंडी, गडगडतेय शेअर प्राईस, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IREDA