22 November 2024 6:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कृषी कायद्याला विरोध | दिल्लीच्या चारही सीमांवर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार

Farmers, Tractor Rally, Borders Of Delhi

नवी दिल्ली, ७ जानेवारी: केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा आज 42 वा दिवस आहे. जोपर्यंत सरकार तिन्ही कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा शेतकरी नेत्यांकडून करण्यात आली आहे. यासाठी ट्रॅक्टर मोर्चाचीदेखील तयारी सुरू आहे. याच दरम्यान, कृषी कायद्यातील अनेक त्रुटींविषयी शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. (Farmers To Hold Tractor Rally Today At Four Borders Of Delhi)

मागील दीड महिन्यापासून राजधानी दिल्लीच्या सीमांवर नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचालनादरम्यान शेतकरी ट्रॅक्टर संचलनही करणार आहेत, त्याचीच ही रंगीत तालीम असल्याचे या शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

नव्या कृषी कायद्यांविरोधात सरकार आणि शेतकऱ्यांत मतभेद काही संपण्याचं नाव घेत नाहीत. सरकारसोबत पुढच्या टप्प्यात आज शेतकरी संघटना शक्ती प्रदर्शन करत आहेत. शेतकरी संघटनांकडून आज सकाळी ११.०० वाजता सिंघु, टिकरी, गाझीपूर आणि शाहजहांपूर या सीमांवरून कुंडली-मानेसर-पलवल केएमपी एक्सप्रेस वेकडे ‘ट्रॅक्टर मार्च’ काढला जातोय. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्तानं शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केलीय, त्यापूर्वी शेतकऱ्यांकडून हे शक्ती प्रदर्शन केलं जातंय.

 

News English Summary: Disagreements between the government and farmers against the new agricultural laws are not going away. In the next phase with the government, the farmers’ organisations are demonstrating their strength today. A ‘Tractor March’ is being taken out from Kundhu-Manesar-Palwal KMP Express at the border of Singhu, Tikri, Ghazipur and Shahjahanpur at 11.00 am today. The farmers have announced to hold a tractor rally on January 26 on the occasion of Republic Day.

News English Title: Farmers To Hold Tractor Rally Today At Four Borders Of Delhi news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x