22 November 2024 10:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

IAS अधिकाऱ्याला आईवरून शिवीगाळ | तेच आपल्याबाबत घडताच पोलीस अधिकारी लक्ष - सविस्तर वृत्त

MNS clashes, Vasai Virar Police, Senior inspector Rajendra Kamble

मुंबई, ८ जानेवारी: तीन दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून वसई-विरार येथे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला, वसई-विरार महापालिका क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयुक्त भेट देत नाहीत, म्हणून मनसेच्या २ कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या परिवहन सेवेच्या लोकार्पण सोहळ्यात घोषणाबाजी करण्यात आली. मागील ६ महिन्यापासून पत्र व्यवहार आणि संपर्क साधूनही वसई-विरार पालिका आयुक्त वेळ देत नसल्याने आंदोलन केल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं.

मात्र या घोषणा देणाऱ्या मनसेच्या २ कार्यकर्त्यांना तिथे बंदोबस्ताला हजर असणाऱ्या पोलीस निरीक्षण राजेंद्र कांबळे यांनी मारहाण आणि आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा आरोप मनसेकडून केला जात आहे, त्याबाबत काही व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. त्यानंतर पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, महाराष्ट्र सैनिक दाखवून देऊ, असा थेट आव्हान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोलिसांना दिलंय. वसईत मंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात राडा घालणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केली. तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केलाय. त्यावरून त्यांनी ठाकरे सरकारवरही निशाणा साधलाय. पोलिसांनी सरकारच्या मध्यस्थींसारखे वागू नये, अशी विनंती त्यांनी केली. महाराष्ट्रातील पोलिसांच्या पाठीशी नेहमीच मनसे उभी राहत आली आहे, याची आठवण संदीप देशपांडेंनी करून दिलीय.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या लोकार्पण सोहळ्यात घोषणाबाजी केली होती आणि त्यांचा मार्ग हा लोकशाही धरूनच होता यात वाद नाही. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कायद्याच्या चौकटीत बसेल त्याप्रमाणे कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र वर्दी बाजूला, दोन हात करा आणि तुमच्यामुळे महाराष्ट्र पोलीस बदनाम होतं आहेत असं कॅम्पेन सुरु ठेवणे म्हणजे मनसेकडून देखील अतिरेक होत असल्याची चर्चा आता पोलिसांमध्येच सुरु झाली आहे.

त्यात कर्तव्यावर असताना एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने अशाप्रकारे आई-बहिणीवरून शिवीगाळ करणे हे पटणारं नाहीच. मात्र मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आमच्या आई बहिणी रस्त्यावर पडल्या नसल्याचं सांगत असले तरी काही दिवसांपूर्वी याच अविनाश जाधव हे वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त डी गंगाथरन यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी, सोबत २-३ जणांना घेऊन भेटण्याची परवानगी मिळाली होती परंतु अविनाश जाधव यांना त्यांच्यासोबत आलेय सर्व ७-८ लोकांना घेऊन भेट द्यावी असा हट्ट होता. परिणामी त्यांना भेट मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत राडा घातला आणि धक्कादायक म्हणजे त्यांनी वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त डी गंगाथरन यांच्या नावे थेट आई वरूनच ऑन रेकॉर्ड शिवीगाळ केली होती. त्यानंतर देखील बरच राजकारण रंगलं होतं. मात्र त्यावेळी आपण केलेल्या शिवीगाळचं त्यांनी समर्थन केलं. मात्र आज तेच आपल्याबाबत घडताच यावरून संबंधित अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लक्ष केलं जातं आहे.

संबधित पोलीस अधिकारी राजेंद्र कांबळे देखील आपल्याकडून बंदोबस्ताच्या गडबडीत हे घडल्याचं सांगत आहेत आणि त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याचं देखील ते सांगत आहेत. त्यानंतरही त्यांना व्हिलन ठरवण्याचे सर्व प्रयत्न समाज माध्यमांवर सुरु आहेत. वास्तविक संबधित अधिकारी राजेंद्र कांबळे तसे आहेत का याची देखील खात्री केली जातं नाही. दुसरीबाजूला कॅबिनेट मंत्री तसेच पालकमंत्री, IAS अधिकारी उपस्थित असताना आंदोलनाचे प्रकार अचानक घडल्यास सुरक्षेची जवाबदारी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला कशा कशाला तोंड द्यावं लागतं याची मनसे कार्यकर्त्यांना कल्पनाही नसावी. त्यांना थेट सत्ताधाऱ्यांचे तळवे चाटणारे असे लेबल कोणत्या आधारावर लावले जातात त्याचा ही अंदाज नसतो. संबंधित अधिकारी राजेंद्र कांबळे यांचा मागील रेकॉर्ड चांगला असून ते समाजाला सोबत घेऊन जाणारे अधिकारी आहेत असंच दिसतं. (येथे वाचू शकता)

अविनाश जाधव यांच्याकडून IAS अधिकाऱ्यांला दिली गेलेली शिवी ही जोशमध्ये दिली गेली असेल तर तोच प्रकार संबंधित अधिकाऱ्याकडून घडला आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र त्यांना निलंबित करून त्यांचं संपूर्ण कुटूंब रस्त्यावर आणा असा सध्या मनसेने निश्चय केलेला दिसतो. त्यानंतरही राजेंद्र कांबळे यांच्या विरुद्ध तशी कारवाई होणार असेल तर अविनाश जाधव यांच्या विरुद्ध कोणती टोकाची कारवाई व्हायला हवी असं देखील प्रशासनातील अधिकारी ऑफ रेकॉर्ड बोलत आहेत. कारण आई तर IAS किंवा इतर अधिकाऱ्यांची देखील रस्त्यावर पडल्या नाही हे वास्तव त्यांनी समजून घ्यावं आणि विषय वेळीच संपुष्ठात आणावा असं दुसरी बाजू जाणून घेतल्यावर लक्षात येतंय.

 

News English Summary: Three days ago, MNS workers tried to disrupt Minister Eknath Shinde’s program at Vasai-Virar. The commissioner does not visit to discuss issues in the Vasai-Virar Municipal Corporation area, so two MNS workers made a proclamation at the inauguration ceremony of the municipal transport service. According to MNS, the agitation was started for the last 6 months as the Vasai-Virar Municipal Commissioner was not giving time despite correspondence and contact.

News English Title: MNS clashes with Vasai Virar senior police inspector Rajendra Kamble news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x