21 April 2025 10:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

नामांतराशिवाय राज्यात इतरही प्रश्न आहेत | उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Renaming, Aurangabad, Sambhajinagar

पुणे, ८ जानेवारी: नामांतराशिवाय राज्यात इतरही प्रश्न आहेत, असं पुन्हा एकदा ठणकावून सांगताना लसीकरण, कोरोना याविषयी काम करणं गरजेचं असल्याचं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात बोलत होते.

औरंगाबाद नामांतरावरुन राज्यातलं राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालंय. नामांतर झालंच पाहिजे, अशी भूमिका सेनेने घेतलीय तर काँग्रेसने नामांतराला कडाडून विरोध केलाय. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने मात्र सावध भूमिका घेत नामांतराचा प्रश्न महाविकास आघाडी एकत्रित बसून सोडवेल, असं म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज याच भूमिकेचा पुनरुच्चार केला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असा करण्यात आल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेतला असला तरी हा उल्लेख पूर्वीपासूनच सुरू असल्याचे दिसून येते. एवढेच नव्हे तर डिसेंबरमधील मंत्रिमंडळातील निर्णयांची माहिती देताना काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या नावाने करण्यात आलेल्या ट्वीटमध्येही संभाजीनगर असा उल्लेख झालेला दिसून येतो.

 

News English Summary: Apart from renaming, there are other issues in the state, reiterating that it is necessary to work on vaccination and corona, said Deputy Chief Minister Ajit Pawar. He was speaking in Pune.

News English Title: Apart from renaming, there are other issues in the state said deputy Chief minister Ajit Pawar news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या