25 November 2024 4:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

गोसेखुर्द प्रकल्पाचे काम २०२३ पर्यंत पूर्ण करणार | मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

Gosekhurd project, Bhandara, Completed by 2023, CM Uddhav Thackeray

भंडारा, ८ जानेवारी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केली. तसंच घोडाझरी शाखा कालवा इथं सुरु असलेल्या कामाचीही पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. या कालव्याची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री पुढील दौऱ्यावर निघाले असता, प्रकल्पग्रस्तांनी त्यांचा ताफा अडवला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली आणि निवेदन स्वीकारलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांचा ताफा अचानक थांबल्यानं पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. (Gosekhurd project to be completed by 2023 said CM Uddhav Thackeray)

राज्य सरकारच्या तिजोरीत निधीचा खळखळाट आहे. त्यामुळे आश्वासन देणे संयुक्तिक होणार नाही, तरीही शेतकरी बांधवांना सिंचनाचे सोयीसाठी निधी उपलब्ध करून प्रकल्प पूर्ण करावाच लागेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी उमरेडचे आमदार राजू पारवे, तुमसरचे आमदार राजू कारेमोरे व भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर तसेच सर्व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

तत्पूर्वी पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी रोखल्याचा प्रकार पहायला मिळाला. घोडाझरी कालव्याची पाहणी करुन निघालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा प्रकल्पग्रस्तांनी रोखला. त्यावेळी गाडीतून खाली उतरत मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. गेल्या 35 वर्षांपासून शेतीला पाणी मिळत नसल्याची या शेतकऱ्यांची तक्रार आहे. हजारो कोटी रुपये खर्च करुनही शेती तहानलेलीच असल्याची खंत यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray is on a tour of East Vidarbha today. This time he inspected the Gosekhurd project. The Chief Minister also inspected the ongoing work at Ghodazari branch canal. After inspecting the canal, the Chief Minister was on his next visit when he was stopped by the project victims. At that time, the Chief Minister discussed with the project victims and accepted the statement. Meanwhile, the Chief Minister’s convoy suddenly stopped and a good line of police was blown up.

News English Title: Gosekhurd project to be completed by 2023 said CM Uddhav Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x