19 April 2025 8:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

नाशिकमध्ये अतिशय मोठे नेते बोलले कि नांदगावकर, सरदेसाई, अभ्यंकरांमुळे पक्ष सोडला

MNS leader Bala Nandgaonkar, Shivsena, Vasant Gite

मुंबई, ९ जानेवारी: नाशिकमधील भारतीय जनता पक्षाचे नेते वसंत गीते आणि सुनील बागूल यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत काल शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा आटोपल्यानंतर हे दोन्ही नेते मुंबईला जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील, असं त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी सांगितले होते.

दरम्यान वसंत गीते मनसेत पुन्हा प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र वसंत गीते यांनी मनसेच्या तीन मोठ्या नेत्यांवर आरोप करत मनसेप्रवेशाचे वृत्त फेटाळले होते. मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी वसंत गिते यांच्या निवासस्थानी जाऊन पक्षात परतण्याचं सूचवलं होतं. परंतु, मला ज्या तीन नेत्यांमुळे मनसेतून बाहेर पडावं लागलं, त्या नेत्यांसोबत काम करावं का? असा प्रश्न गिते यांनी विचारला. गिते यांचा रोख पूर्णपणे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई व अविनाश अभ्यंकर यांच्याकडेच होता. नाशिकमध्ये मनसेला आपण वाढवलं, पक्षाचं काम मोठं केल. पण, भविष्यात आपल्याला स्पर्धक निर्माण होईल, म्हणून काही जणांनी मला पक्षातून बाहेर पडण्यास भाग पाडलं, असे यावेळी गिते यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी वसंत गीते यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ‘खाऊ तिथे आम्ही जाऊ’ अशा शीर्षकाची पोस्ट फेसबुकवर लिहून बाळा नांदगावकर यांनी गिते व बागुल यांच्यावर तोफ डागली आहे. आपल्या पोस्टमध्ये नांदगावकर म्हणतात, ‘2 दिवसांपूर्वी नाशिक येथील काही “अतिशय मोठे” नेते बोलले कि नांदगावकर, सरदेसाई, अभ्यंकर यांच्यामुळे पक्ष सोडला. हे तेच “मोठे नेते” आहेत ज्यांनी मनसेची चलती असतांना सेना सोडली, भाजप ची सत्ता असतांना मनसे सोडली, सेने ची सत्ता असताना परत भारतीय जनता पार्टी सोडली. एवढ्या “निष्ठावंत” नेत्यांवर काय बोलणार. यांचे ‘जिथे भेळ तिथे खेळ’ अशा प्रकारचे राजकारण त्यांनाच लखलाभ असो. शक्यतो वैयक्तिक शेरेबाजी करणे राजकीय जीवनात कायम च टाळत आलो, परंतु काही लोक आपली पायरी ओळखून राहत नाही म्हणून ही स्वाभाविक प्रतिक्रिया येते. त्यांना खुप शुभेच्छा व एकच मैत्रीपूर्ण सल्ला आता तरी गेल्या घरी सुखी राहा.

 

News English Summary: Bharatiya Janata Party leaders Vasant Geete and Sunil Bagul from Nashik joined Shiv Sena yesterday in the presence of Shiv Sena MP Sanjay Raut. After the inauguration, the two leaders will travel to Mumbai to meet Chief Minister Uddhav Thackeray, Raut had said at a press conference. Meanwhile, there was talk that Vasant Geete would re-enter the MNS. However, Vasant Geete had denied the news of MNS entry, accusing three senior MNS leaders. Some MNS office bearers had suggested to go to Vasant Gite’s residence and return to the party.

News English Title: MNS leader Bala Nandgaonkar criticised shivsena leader Vasant Gite news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या