22 November 2024 8:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

बर्ड फ्लू | अफवांमुळे पोल्ट्री व्यवसायावर गंभीर परिणाम होतोय

Poultry industry, bird flu, Impact

नवी दिल्ली, ९ जानेवारी: सोशल मीडियामुळे बातमी झपाट्याने पसरत आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात पक्षी मरत आहेत. हरियाणा (हरियाणा) मधून कोंबड्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या आणि समाज माध्यमांवर देखील त्याचा जोरदार प्रसार झाला आहे. दुसरीकडे बर्ड फ्लूची लक्षणे कोंबडीमध्ये देखील आढळली नाहीत. असे असूनही अफवांमुळे पोल्ट्री व्यापारी घाबरले आहेत.

दिल्लीसह देशातील काही राज्यांमध्ये मेलेल्या पक्षांमध्ये बर्ड फ्ल्यू विषाणू आढळल्याच्या बातम्या आहेत. परंतु, अजून देखील पोल्ट्रीमध्ये हा विषाणू शक्यतो कुठेही सापडलेला नाही. परंतु, तरी देखील देशभरात अंडी आणि चिकन यांच्या व्यवसायावर याचे दुष्परिणाम दिसण्यास सुरुवात झालेली आहे.

बर्ड फ्लूमुळे दिल्लीमध्ये सुप्त भीतीदायक परिस्थिती आहे. दिल्लीकरांनी अंडी आणि कोंबडी खाणे टाळण्यास सुरवात केली आहे. त्याचा परिणाम पोल्ट्री व्यावसायिकांवर होऊ लागला आहे. दिल्लीत दहा दिवसांत अंडी आणि कोंबडीच्या खरेदीत मोठी घट झाली आहे. कोंबडी कापून विकणाऱ्या दुकानदाराने सांगितले की बर्ड फ्लूमुळे गेल्या 3-4 दिवसांपासून कोणतीही कमाई होत नाही. पूर्वी आम्ही दररोज 8-10 हजार रुपये इतका धंदा व्हायचा आता फक्त 2 ते 3 हजार रुपये धंदा होत आहे.

 

News English Summary: News is spreading fast due to social media. Birds are dying in Rajasthan and Madhya Pradesh. There have been reports of death of chickens from Haryana (Haryana) and it has also spread on social media. Bird flu symptoms, on the other hand, were not found in chickens either. Despite this, rumors have frightened poultry traders.

News English Title: Poultry industry steps in to quell fear about bird flu news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x