22 November 2024 6:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Health Alert | राज्यात अमरावतीच्या बडनेऱ्या गावांत २८ कोंबड्यांचा अचानक मृत्यू

Sudden death, Hens, Amaravati, Bird Flu

अमरावती, १० जानेवारी: देशात बर्ड फ्लूचा म्हणजेच एवियन इन्फ्लुएंजाचा धोका वाढला आहे. भारतातील एकूण 7 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय. यात केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. याशिवाय छत्तीसगड, महाराष्ट्र आणि दिल्लीत देखील पक्षांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. याचा अंतिम अहवाल येणं बाकी आहे. त्यामुळे हे अहवालाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाने ही माहिती दिली.

आता महाराष्ट्राच्या चिंतेत भर घालणारी माहिती पुढे आली आहे. राज्यातील अमरावतीच्या बडनेऱ्यात गावांत २८ कोंबड्या दगावल्याची माहिती समोर आली आहे. बडनेऱ्यात राहणारे उमेश गुळरांधे, नलिनी फेंडर, गजानन कडव, अजय चोरआमले यांच्याकडील एकूण २८ कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. अचानक जमिनीवर कोसळून कोंबड्या मृत्युमुखी पडल्या, अशी माहिती त्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्याला दिली.

विशेष म्हणजे या सर्व कोंबड्यांना पांढरी शौच झाल्याचे त्यांनी सांगितले. आधीच कोरोनाचं संकट असताना, आता बर्ड फ्लूने हातपाय पसरायला सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये भीतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

News English Summary: Information that has added to Maharashtra’s concerns has come forward. It has come to light that 28 hens were slaughtered in Badnera village of Amravati in the state. A total of 28 hens belonging to Umesh Gulrandhe, Nalini Fender, Gajanan Kadav and Ajay Choramle living in Badnera died. The hens suddenly fell to the ground and died, he informed the veterinary hospital.

News English Title: Sudden death of Hens at Amaravati alert on Bird Flu news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x