25 November 2024 1:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Alert | चेंबूरच्या टाटा कॉलनी परिसरात 9 कावळे मृत अवस्थेत आढळले

Death, 9 crows, Chembur Mumbai, Bird Flu

मुंबई, १० जानेवारी: देशातील सहा राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाल्याने महाराष्ट्र प्रशासनही सावध झालं आहे. लातूर आणि परभणीत कोंबड्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज मुंबईत चेंबूरमध्ये 9 कावळे मेल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशासन अ‍ॅलर्ट झालं असून या कावळ्यांच्या मृत्यू मागचं कारण शोधलं जात आहे.

चेंबूरच्या टाटा कॉलनी परिसरात आज दुपारी 9 कावळे मृत झाल्याचं आढळून आलं. एकाच ठिकाणी हे कावळे मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मुंबई महापालिकेला अ‍ॅलर्ट केलं.

मुंबई पालिकेची एक टीम घटनास्थळी दाखल होत असून मृत कावळ्यांच्या शरीरातील नमूने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाला की नक्की कशामुळे झाला याचा शोध घेण्यात येणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

 

News English Summary: The Maharashtra administration has also become aware of the spread of bird flu in six states of the country. While the deaths of chickens in Latur and Parbhani are still fresh, the death of 9 crows in Chembur in Mumbai today has created a stir. Therefore, the administration has been alerted and the cause of death of these crows is being investigated.

News English Title: Death of 9 crows in Chembur in Mumbai today has created a stir news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x