22 November 2024 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

व्हॉट्सअ‍ॅपला प्रायव्हसी पॉलिसी अंगलट | युजर्सकडून Signal वर स्विच होण्यास सुरुवात

Whatsapp, Signal app, New privacy policy

मुंबई, ११ जानेवारी: जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. ही पॉलिसी 8 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीमुळे अनेक युजर्स नाखुश आहेत. त्यामुळे युजर्स आता व्हॉट्सअ‍ॅपला दुसरे पर्याय शोधू लागले आहेत. युजर्स प्रायव्हसी फोकस्ड इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप सिग्नल वर स्विच होत आहेत. आता हे अ‍ॅप भारतासह अनेक देशांमध्ये टॉप फ्री अ‍ॅप बनलं आहे.

अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या फ्री अ‍ॅप्सच्या यादीत सिग्नल अ‍ॅप पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकून भारतातील अव्वल फ्री अ‍ॅप बनल्याची माहिती सिग्नल अ‍ॅपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिलीये. यासोबत एक स्क्रीनशॉटही शेअर केला असून कॅप्शनमध्ये ‘बघा तुम्ही काय केलं?’, अशा आशयाचं ट्विट केलं आहे. भारताशिवाय जर्मनी, ऑस्ट्रिया, फिनलँड, हाँग काँग आणि स्विझर्लंड या देशांमध्येही सिग्नल टॉप डाउनलोड अ‍ॅप ठरलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे को-फाउंडर ब्रायन एक्टन यांनी सिग्नल फाउंडेशन तयार केलं. 2014 मध्ये हे लाँच करण्यात आलं. सध्या सिग्नल अ‍ॅपचे सीईओ मॉक्सी मार्लिनस्पाइक (Moxie Marlinspike) आहेत. ‘Say Hello to Privacy’ अशी या अ‍ॅपची टॅगलाईन आहे.

 

News English Summary: WhatsApp, the world’s most used instant messaging app, has updated its privacy policy. This policy will be effective from 8th February. Many users are unhappy with WhatsApp’s new policy. So users are now looking for another alternative to WhatsApp. Users are switching to privacy focused instant messaging app signals. Now this app has become a top free app in many countries including India.

News English Title: Whatsapp user switching to Signal app after Whatsapp news privacy policy new updates.

हॅशटॅग्स

#Whatsapp(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x