22 November 2024 7:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

पोलिसांना मारहाण | त्यांचं करिअर संपेल की कदमांचं? | उत्तर भारतीय व्होटबँक कनेक्शन

Mumbai Police, BJP Mahamantri, Deepu Tiwari arrested

मुंबई, १२ जानेवारी: राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ले करणं नवं राहिलेलं नाही. यामध्ये सर्वाधिक हल्ले हे रहदारी दरम्यान होतात आणि त्यात वाहतूक पोलीस सर्वाधिक लक्ष होतात. काल पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाईकवरून भरधाव वेगाने ट्रिपल सीट जात एका वृद्धेला धडक देण्यात आली. यावेळी संबधित तिघांना हटकणाऱ्या पवई पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविण्यात आला. त्यादरम्यान पवई पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे हे जखमी झाले.

याप्रकरणी सचिन तिवारी नामक इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर मुख्य आरोपी दिपू तिवारी व आयुष राजभर यांचा शोध सुरू असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून हे सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याच आरोपी कार्यकर्त्यांना वाचविण्यासाठी भाजपचे आमदार राम कदम यांचा पोलिसांना कॉल करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

यानंतर राम कदम यांनी पोलिसांना फोन करुन आरोपींना सोडून देण्याची विनंती केली. “मी हल्ल्याचं समर्थन करत नाही. पण हा त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे. त्यांचं अजून लग्नही झालेलं नाही. माणुसकीच्या नात्याने आणि त्यांच्या भविष्याचा विचार करता आपापसातही हे प्रकरण मिटलं असतं. तुम्ही इच्छा असेल तर कानाखाली मारा,” असं राम कदम सांगत असल्याचं ऐकू येत आहे.

राम कदम यांनी यावेळी त्यांची सुटका करा सांगणं योग्य नाही असं सांगत यामुळे त्यांचं करिअर संपेल असं म्हटलं. दुसरीकडे कॉन्सेबल राम कदम यांना मी आमदार म्हणून तुमचा आदर करतो, पण जर त्यांची सुटका केली तर महाराष्ट्र पोलिसांना मारहाण करण्याची हिंमत त्यांच्यात येईल असं उत्तर दिलं.

“तिघांनीही एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. माझ्याजागी तुम्ही असता तर काय केलं असतं? त्यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं आहे. माझाही आत्मसन्मान आहे,” असं पोलीस कॉन्स्टेबल बोलताना ऐकू येत आहे. मात्र राम कदम यांनी एका आरोपीला वाचविण्यासाठी एवढा मोठा पुढाकार का घेतला आणि त्यांचं करिअर संपेल असं का म्हटलं याचं उत्तर मिळालं आहे. कारण पोलिसांवर हल्ला करणारा आरोपी दिपू तिवारी हा आमदार राम कदम यांच्या घाटकोपर मतदार संघातील भाजपचा महामंत्री असून तो थेट उत्तर भारतीय मतदारांशी जोडलेला असल्याने, राम कदम यांना स्वतःचं करिअर संपेल असं वाटू लागल्याची कुजबुज घाटकोपरमध्ये सुरु झाली आहे.

 

 

News English Summary: Political party activists should not attack the police. Most of these attacks take place during traffic and the traffic police receive the most attention. Yesterday, an old man was hit by a speeding triple seat on a bike at Powai police station. At this time, two employees of Powai police station were attacked. Meanwhile, Nitin Khairmode, a police officer working at Powai police station, was injured.

News English Title: Mumbai Police attack BJP Mahamantri Deepu Tiwari arrested news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x