21 November 2024 4:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News
x

अमेरिकन कार कंपनी टेस्लाची भारतात एंट्री | कर्नाटकमधून व्यवसायाला सुरूवात

Elon Musk, auto company Tesla, In India

बंगळुरू, १३ जानेवारी: अमेरिकन कार कंपनी टेस्लाची अखेर भारतामध्ये एंट्री झाली आहे. दिग्गज उद्योगपती एलन मस्क यांनी यापूर्वी अनेकदा ट्विटरवरुन याबाबतचे संकेत दिले होते. आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. टेस्ला कंपनीनं 8 जानेवारी रोजी भारतामध्ये नोंदणी केली आहे.

टेस्ला कंपनीनं त्यांचं ऑफिस सुरु करण्यासाठी बंगळुरुची निवड केली आहे. बंगळुरुमधील रिचमंड सर्कल जंक्शन भागात टेस्ला कंपनीचं ऑफिस असेल. या ठिकाणी कंपनीचा संशोधन आणि विकास ऑफिस असेल, अशी माहिती आहे. कंपनीनं भारतामधील कामकाज पाहण्यासाठी तीन संचालकांची देखील नियुक्ती केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी कंपनीचं स्वागत केलं आहे.

दरम्यान, टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरवरुन काही दिवसांपूर्वी कंपनीच्या भारतातील योजनांबाबत माहिती दिली होती. याशिवाय केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही टेस्ला (Tesla) 2021 च्या सुरुवातीला भारतात पदार्पण करेल असं म्हटलं होतं. टेस्ला ‘मॉडेल 3’ या इलेक्ट्रिक कारपासून भारतात सुरुवात करणार आहे. मॉडेल 3 ही सेडान प्रकारातली कार असून ती 0 ते 100 किमीप्रतितास इतका वेग केवळ 3.1 सेकंदात गाठू शकते. याची रेंज 500 किमी पेक्षा अधिक आहे.

 

News English Summary: American car company Tesla has finally entered India. Veteran businessman Alan Musk had hinted at this several times before on Twitter. Now the wait is finally over. Tesla has registered in India on January 8. Tesla has chosen Bangalore to start its office. Tesla will have its office at Richmond Circle Junction in Bangalore. It is learned that the company will have a research and development office at this place. The company has also appointed three directors to oversee operations in India. Karnataka Chief Minister B.S. Yeddyurappa has welcomed the company.

News English Title: Elon Musk auto company Tesla enters in India news updates.

हॅशटॅग्स

#cars(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x