22 November 2024 5:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कोरोना लसीकरण | राज्यात कोणत्या व्यक्तींना कोरोनावरील लस मिळणार नाही?

corona vaccine, minister Rajesh Tope, vaccinations

मुंबई, १३ जानेवारी: राज्यात कोरोनाचं लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता सीरम इंन्स्टिट्यूटकडून राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये लसीचे डोस पोहोचवले जात आहेत. कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील मोहिमेत कोणाला सर्वात आधी लस मिळणार ती कोणाला देऊ नये आणि कसं असेल नियोजन याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार राज्यामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार १८ वर्षांखालील व्यक्ती, गरोदर महीला, तसेच कोणत्याही ऍलर्जी असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार नाही,’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. तसंच, लसीकरणाच्या या कार्यक्रमात अॅक्टिव्ह रुग्णांनी लस तूर्तास देण्यात येणार नाही कारण आरोग्य कर्मचाऱ्यांनाच लस देण्यात यावी, असं केंद्रानं बंधनकारक केलं आहे. असंही ते म्हणाले.

‘मी दोन दिवसांपूर्वीच करोना लसीकरणासाठी ५११ केंद्रावर नियोजन केलं होतं. पण काल झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने इतक्या मोठ्या स्तरावर लसीकरण करु नका असं सांगितलं. त्यामुळं ५११ वरुन ही संख्या ३५० केली आहे,’ असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. शिवाय, ‘प्रत्येक लसीकरण केंद्रावर १०० अशा पद्धतीने पहिल्या दिवशी ३५ हजार जणांना लस देण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

 

New English Summary: Corona vaccination in the state will start from January 16. Against this backdrop, serum institutes are now delivering vaccine doses to several districts across the state. State Health Minister Rajesh Tope has said that in the first phase of the anti-corona vaccination campaign, who will be the first to be vaccinated should not be given and how to plan.

New English Title: Who will not get corona vaccine informed by health minister Rajesh Tope news updates.

हॅशटॅग्स

#RajeshTope(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x