अॅमेझॉन अॅकॅडमी | E-learning Entry | JEE ते स्पर्धा परीक्षांची ऑनलाईन तयारी
मुंबई, १४ जानेवारी: अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी, अॅमेझॉन इंडियाने अॅमेझॉन अॅकॅडमी सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, या ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण सामग्री, लाइव्ह लेक्चरद्वारे जेईईसाठी नियमित तयारी करवून घेतली जाईल. तसेच गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांचे विस्तृत मूल्यांकन उपलब्ध करुन दिले जाईल. अॅमेझॉन अॅकॅडमीची बीटा आवृत्ती व्हीबँड आणि गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध असेल.
निवेदनात पुढे म्हटले आहे की अॅमेझॉन अॅकॅडमी विद्यार्थ्यांना जेईईच्या तयारीशी संबंधित संसाधने प्रदान करेल. त्यांना तज्ञांनी तयार केलेले 15,000 हून अधिक प्रश्न उत्तरांसह प्रदान केले जातील. ही सर्व शिक्षण सामग्री आणि परीक्षेची सामग्री देशभरातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी विकसित केली आहे. जेईईबरोबरच, BITSAT, VITEEE, SRMJEEE आणि MET तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या उपलब्ध कंटेंटचा फायदा होईल.
मॉक टेस्टमध्ये चॅप्टर टेस्ट, पार्ट टेस्ट आणि फुल टेस्ट समाविष्ट आहे, जे जेईई पॅटर्नचे अनुसरण करते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षेची तयारी करण्यास मदत मिळणार आहे. या चाचण्या खास जेईईची समज आणि अनुभव देण्यासाठी तयार केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचे बारकावे समजण्यास मदत होते.
अमेझॉन अकॅडमीचे हे स्टडी मटेरियल विदयार्थ्यांसाठी सध्या मोफत उपलब्ध होत असून पुढील काही महिन्यांपर्यंत हे मोफत असेल असेही कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलंय. अमेझॉन अकॅडमीने या संबंधी एक निवेदन प्रसिध्द केलं असून त्यात म्हंटलं आहे की, “उच्च गुणवत्तापूर्ण आणि सर्वांना परवडेल अशा शिक्षणाचा प्रसार करणे हे अमेझॉनचे ध्येय आहे. सध्या केवळ जेईई परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अशा प्रकारचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे पण भविष्यात इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अमेझॉन इंडिया सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.”
News English Summary: To help students prepare for the joint entrance exam for admission to engineering colleges, Amazon India has announced the launch of Amazon Academy. The company said in a statement that through this online platform, students will be regularly prepared for JEE through educational materials, live lectures. Detailed assessments in Mathematics, Physics and Chemistry will also be provided. The beta version of Amazon Academy will be available for free on Viband and Google Play Store.
News English Title: Amazon academy entry in coaching classes for students to preparing for JEE and other competitive exams news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल