22 April 2025 5:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Good News | महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळणार

Anganwadi Sevika, Maharashtra state, Retirement benefits

मुंबई, १४ जानेवारी: महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना आता सेवानिवृत्तीचा लाभ तात्काळ मिळणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस व लघु अंगणवाडी सेविका यांना सेवानिवृत्ती, राजीनामा किंवा मृत्यू झाल्यानंतर भारतीय विमा निगमतर्फे लाभाची रक्कम एकरकमी प्रदान करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा लाभ ताबडतोब मिळावा म्हणून वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी सूचना केली होती. या सूचनेला महिला व बाल विकास मंत्रालयाने अंमलात आणण्याचा निर्णय झाला आहे. ऑनलाईन पोर्टल विकसित केल्यास हक्काची रक्कम तत्परतेने मिळू शकत असल्याचे डॉ. ओंबासे यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान या निर्णयाच्या अंमलबजावणीचे निर्देश महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.

महाराष्ट्रात 10,8005 अंगणवाड्या/ मिनी अंगणवाडी केंद्रे आहेत. राज्यात 550 पेक्षा जास्त एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प चालू आहेत. ज्यामध्ये 4000 पेक्षा जास्त पर्यवेक्षक आणि अंदाजे 2 लाख अंगणवाडी कर्मचारी/ मदतनीस आणि छोट्या अंगणवाडीमधील कर्मचारी कार्यरत आहेत आणि ते संपुर्ण आईसीडीएस प्रकल्प निम्नस्तरापासून चालवत आहेत.

एलआयसीमार्फत अंगणवाडी सेविकांना वयाची 65 वर्ष पूर्ण सेवानिवृत्त झाल्यानंतर एक लाख रुपये एकरकमी लाभ देण्यात येणार आहे. तसेच राजीनामा , सेवेतून काढून टाकण्यात आलेले व सेवेत कार्यरत असताना मृत्यू पावलेल्या सेविकांच्या वारसदारांसही एवढीच रक्कम देण्यात येणार आहे. मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 75 हजार रु. रक्कम देण्यात येणार आहे.

 

News English Summary: Anganwadi workers in Maharashtra will now get immediate retirement benefits. Anganwadi workers, helpers and minor Anganwadi workers will be provided a lump sum benefit by the Insurance Corporation of India after retirement, resignation or death.

News English Title: Anganwadi Sevika across Maharashtra state will now get retirement benefits news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या