24 November 2024 4:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

शेतकरी हिताशी तडजोड नाही | भूपिंदर सिंह मान यांची समितीतून माघार

Bhupinder Singh Mann, exit, supreme court, appointed committee

नवी दिल्ली, १४ जानेवारी: सुप्रीम कोर्टानं कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. शेतकरी आंदोलन आणि कृषी कायदे यावर तोडगा काढण्यास चार सदस्यांची समिती स्थापन करण्याचा आदेश कोर्टानं दिला. दुसरीकडे शेतकऱ्यांनी मात्र संयुक्त समितीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.

सुप्रीम कोर्टाकडून गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये भारतीय किसान युनियनचे भूपिंदर सिंह मान, शेतकरी संघटनेचे अनिल घनवंत, कृषी अर्थशास्त्रज्ञ अशोक गुलाटी तसंच आंतरराष्ट्रीय खाद्य धोरण संशोधन संस्थेचे प्रमोद जोशी यांचा समावेश आहे.

ही समिती आपला अहवाल थेट सर्वोच्च न्यायालयाला सादर करणार आहे. जेव्हापर्यंत समिती आपला अहवाल सादर करणार नाही, तोपर्यंत कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीची स्थगिती कायम राहील. दरम्यान या समितीतील प्रतिनिधी हे सरकार समर्थक असल्याचा आरोप शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केला आहे.

दरम्यान याच समितीत भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष भूपिंदर सिंह मान यांचाही एक सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र, आज भूपिंदर सिंह मान यांनी या समितीतून काढता पाय घेतलाय. समितीमध्ये भूपिंदर सिंह मान यांच्या नावाच्या असलेल्या समावेशावरून अगोदरपासूनच मोठी टीका केली जातेय. तसंच समितीतील चारही सदस्यांनी कृषी कायद्याचं समर्थन केलं होतं. त्यामुळे या समितीवरही विश्वास दर्शवण्यास शेतकऱ्यांनी नकार दिलाय. शेतकरी संघटनांच्या म्हणण्यानुसार, भूपिंदर सिंह मान यांनीही अगोदरच कृषी कायद्यांचं समर्थन केलं होतं.

यानंतर, भूपिंदर सिंह मान यांनी एक पत्र लिहून समितीतून बाहेर पडत असल्याची माहिती दिलीय. समितीत आपल्याला सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. तसंच आपण नेहमीच पंजाब आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी उभं असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

 

News English Summary: The committee also included Bhupinder Singh Mann, national president of the Indian Farmers’ Union, as a member. However, today Bhupinder Singh Mann has stepped out of the committee. Bhupinder Singh Mann’s inclusion in the committee has already been widely criticised. Also, all the four members of the committee had supported the Agriculture Act. Therefore, the farmers refused to show faith in this committee. According to farmers’ organisations, Bhupinder Singh Mann had already supported the agriculture laws.

News English Title: Bhupinder Singh Mann exit from supreme court appointed committee on farm laws News updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x