माझं वाक्य लक्षात ठेवा | कृषी कायदे रद्द करण्यास सरकारला भाग पाडू - राहुल गांधी
नवी दिल्ली, १४ जानेवारी: राहुल गांधी यांनी आज पुन्हा कृषी कायद्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या मदुराई येथे जलीकट्टूच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत राहुल यांधी शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं. “देशातील काही मूठभर श्रीमंत मित्रांसाठी मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. दुर्लक्ष हा शब्द देखील खूप छोटा भासेल अशापद्धतीची वागणूक आज आंदोलक शेतकऱ्यांना दिली जात आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.
“देशातील शेतकरी संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जर तुम्हील शेतकऱ्यांना नाखूष ठेवून काही निर्णय घेणार असाल तर याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील. तुम्ही इतिहास पडताळून पाहा. जेव्हा केव्हा भारतीय शेतकरी कमकुवत झाला आहे. तेव्हा संपूर्ण देश कमकुवत झाल्याचं आपण पाहिलं आहे”, असं राहुल म्हणाले.
राहुल गांधी यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्याबाबत एक महत्वाचं विधान यावेळी केलं. “तुम्ही माझं हे वाक्य अधोरेखितच करुन ठेवा. कृषा कायदे रद्द करण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू. मी काय म्हणालो ते नीट लक्षात ठेवा”, असं राहुल यांनी निक्षून सांगितलं.
Mark my words. Take it from me. The Government will be forced to take these laws (the three #FarmLaws), back. Remember what I said: Congress leader Rahul Gandhi, in Madurai, Tamil Nadu pic.twitter.com/UJCcUJGJHh
— ANI (@ANI) January 14, 2021
दरम्यान, सुप्रीम कोर्टानं कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. शेतकरी आंदोलन आणि कृषी कायदे यावर तोडगा काढण्यास चार सदस्यांची समिती स्थापन करण्याचा आदेश कोर्टानं दिला. दुसरीकडे शेतकऱ्यांनी मात्र संयुक्त समितीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.
सुप्रीम कोर्टाकडून गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये भारतीय किसान युनियनचे भूपिंदर सिंह मान, शेतकरी संघटनेचे अनिल घनवंत, कृषी अर्थशास्त्रज्ञ अशोक गुलाटी तसंच आंतरराष्ट्रीय खाद्य धोरण संशोधन संस्थेचे प्रमोद जोशी यांचा समावेश आहे.
मात्र याच समितीत भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष भूपिंदर सिंह मान यांचाही एक सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र, आज भूपिंदर सिंह मान यांनी या समितीतून काढता पाय घेतलाय. समितीमध्ये भूपिंदर सिंह मान यांच्या नावाच्या असलेल्या समावेशावरून अगोदरपासूनच मोठी टीका केली जातेय. तसंच समितीतील चारही सदस्यांनी कृषी कायद्याचं समर्थन केलं होतं. त्यामुळे या समितीवरही विश्वास दर्शवण्यास शेतकऱ्यांनी नकार दिलाय. शेतकरी संघटनांच्या म्हणण्यानुसार, भूपिंदर सिंह मान यांनीही अगोदरच कृषी कायद्यांचं समर्थन केलं होतं.
यानंतर, भूपिंदर सिंह मान यांनी एक पत्र लिहून समितीतून बाहेर पडत असल्याची माहिती दिलीय. समितीत आपल्याला सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. तसंच आपण नेहमीच पंजाब आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी उभं असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
News English Summary: Rahul Gandhi made an important statement in support of the ongoing farmers’ movement in Delhi. “Keep your words underlined. We will force the government to repeal the agriculture laws. Remember what I said,” said Rahul Gandhi.
News English Title: Mark my words the Government will be forced to take these laws back said Rahul Gandhi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS