19 April 2025 10:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

BREAKING | धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणू शर्माची 3 वाजता पत्रकार परिषद

Renu Sharma, Press conference, Dhananjay Munde controversy

मुंबई, २५ जानेवारी: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली होती. परंतु, राष्ट्रवादी पक्षाने धनंजय मुंडे यांची पाठराखण करत तुर्तास दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे बलात्काराचा आरोप करणारी रेणू शर्मानेही यू-टर्न घेतला आहे. त्यानंतर आता दुपारी 3 वाजता रेणू शर्मा आपल्या वकिलांसोबत पत्रकार परिषद घेणार आहे. (Renu Sharma will take press conference at 3 P M today over Dhananjay Munde controversy)

रेणू शर्मा यांच्याकडून आज दुपारी 3 वाजता एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी हे सुद्धा असणार आहे. आतापर्यंत जे काही आरोप करण्यात आले होते, या प्रकरणावर रेणू शर्मा बोलणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. या केसमध्ये रमेश त्रिपाठी हे रेणू शर्मा यांचे वकील आहेत. आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्याचबरोबर आपल्याला बदनाम करण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप त्रिपाठी यांनी केला आहे. तसंच पीडित महिलेवर अर्थात रेणू शर्मा यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, त्याबाबत आपण स्वत: लवकरच खुलासा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

 

News English Summary: NCP leader and state social justice minister Dhananjay Munde’s plight was exacerbated. However, the NCP has followed Dhananjay Munde’s lead. On the other hand, Renu Sharma, who has been accused of rape, has also taken a U-turn. After that, Renu Sharma will hold a press conference with her lawyers at 3 pm.

News English Title: Renu Sharma will take press conference at 3 P M today over Dhananjay Munde controversy news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या