25 November 2024 2:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

रेणू शर्माला राजकीय फायद्यासाठी भडकवलं जातंय? राजकीय चर्चा सुरु

Renu Sharma, advocate Ramesh Tripathi, MP Kirit Somaiya

मुंबई, २५ जानेवारी: रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. या केसमध्ये रमेश त्रिपाठी हे रेणू शर्मा यांचे वकील आहेत. आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्याचबरोबर आपल्याला बदनाम करण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप त्रिपाठी यांनी केला आहे. तसंच पीडित महिलेवर अर्थात रेणू शर्मा यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, त्याबाबत आपण स्वत: लवकरच खुलासा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

तत्पूर्वी रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांच्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांच्याबाबत आता विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. त्यांच्यावर 2018 साली वाशीच्या एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळतेय. आपल्या महिला असिस्टंट वकिलावर विनयभंग केल्याचा त्यांच्यावर आरोप असून, त्यांच्यावर कलम 354 ( अ ) च्या कलमाखाली गुन्ह्य दाखल असल्याचंही समजतंय. याच प्रकरणावर येत्या 20 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.

रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी हे भाजप किसान मोर्चाचे पदाधिकारी असल्याचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. त्यांच्या नावाचे चौकीदार रमेश त्रिपाठी असे फेसबुक पेजसुद्धा दिसत आहे. रमेश त्रिपाठी यांचे वाशी येथील 17 प्लाझा याठिकाणी कार्यालय असल्याची सुद्धा माहिती मिळालीय. पण नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी ते भाजपचे पदाधिकारी नसल्याचं सांगितलं. त्यामुळे रमेश त्रिपाठी नक्की कोण? हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे ओशिवरा पोलिस ठाण्यात किरीट सोमैया देखील रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांच्यासोबत फिरत असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे तिला राजकीय फायद्यासाठी कोणी फूस लावत नाही ना अशी राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली होती. परंतु, राष्ट्रवादी पक्षाने धनंजय मुंडे यांची पाठराखण करत तुर्तास दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे बलात्काराचा आरोप करणारी रेणू शर्मानेही यू-टर्न घेतला आहे. त्यानंतर आता दुपारी 3 वाजता रेणू शर्मा आपल्या वकिलांसोबत पत्रकार परिषद घेणार आहे.

 

News English Summary: Renu Sharma has accused Dhananjay Munde of rape. He has also lodged a complaint at Oshiwara police station. Ramesh Tripathi is Renu Sharma’s lawyer in this case. You are being threatened with death. At the same time, Tripathi has accused him of defaming him. He also said that he would soon reveal the allegations against the victim, namely Renu Sharma.

News English Title: Renu Sharma advocate Ramesh Tripathi and BJP leader Kirit Somaiya news updates.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x