22 November 2024 5:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

ते काही बोलतील त्यावर मी बोलायाचे का? | निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय

Deputy CM Ajit Pawar, BJP leader Nilesh Rane

मुंबई, २५ जानेवारी: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेला बलात्काराचा आरोप व ड्रग्ज प्रकरणात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला झालेल्या अटकेमुळं राष्ट्रवादी काँग्रेस सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मुंडे व मलिक यांच्यासह राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली आहे. माजी खासदार नीलेश राणे यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केला आहे.

नरेंद्र मोदी यांच्यामुळं लोकांना डिजिटल पेमेंट करायची सवय झाली आणि डिजिटल पेमेंटमुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला. राष्ट्रवादीत चाललंय काय? जितके गुन्हेगार राष्ट्रवादी पक्षात आहेत, तितके एखाद्या तुरुंगातही नसतील, असं नीलेश राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

निलेश राणेंच्या या वक्तव्याबद्दल प्रसार माध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, “ते काही बोलतात आणि त्यावर मी बोलायाचे का? पण एक सांगतो त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय,” अशा शब्दांत अजित पवार यांनी निलेश राणेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

 

News English Summary: The Nationalist Congress Party (NCP) is currently being targeted by the state’s social justice minister Dhananjay Munde over allegations of rape and the arrest of minority minister Nawab Malik’s son-in-law in a drug case. BJP leaders, including Munde and Malik, have criticised the NCP. Former MP Nilesh Rane has leveled serious allegations against the NCP.

News English Title: Deputy CM Ajit Pawar slams BJP leader Nilesh Rane over statement against NCP party news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x