21 November 2024 11:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मोदी सुरक्षित तर देश सुरक्षित | मोदींनी मीडियासमोर कोरोना लस टोचून घ्यावी

NCP MLA Amol Mitkari, PM Narendra Modi, Corona vaccination

मुंबई, २५ जानेवारी: देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण १६ जानेवारीपासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. याआधी केंद्र सरकारने राज्यांना लसीकरणासंबंधी नियमावली पाठवली आहे. या नियमावलीत लसीकरणादरम्यान कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या नाही याचा उल्लेख करण्यात आला आहे.

कोरोना योध्याना सर्वात आधी लशीचा लाभ मिळणार असून, त्यापैकी काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे संवादही साधणार आहेत. लसीकरण मोहिमेच्या प्रारंभावेळी लशींचा पुरवठा आणि वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होईल, अशी माहिती दिली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांसमोर कोरोना लस टोचून घ्यावी, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यावर भारतीय जनता पार्टीचा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी आधी मीडियासमोर येऊन लस टोचून घ्यावी. म्हणजे आमचाही त्यावर विश्वास बसेल, असं मिटकरी म्हणालेत.

मोदी सुरक्षित तर देश सुरक्षित असेल. म्हणून आधी मोदींनी लस टोचून घ्यावी, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. दरम्यान, पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

 

News English Summary: NCP MLA Amol Mitkari has appealed to Prime Minister Narendra Modi to inject corona in front of the media. The Bharatiya Janata Party has great faith in Prime Minister Modi. Therefore, they should first come in front of the media and get vaccinated. That means we will also believe in it, said Amol Mitkari.

News English Title: NCP MLA Amol Mitkari target PM Narendra Modi over corona vaccination news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x