27 April 2025 3:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI च्या या फंडात डोळे झाकून गुंतवणूक करा, 5 पटींनी पैसा वाढवा, सविस्तर जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Suzlon Share Price | सुझलॉन शेअर फोकसमध्ये; 6 महिन्यात 18% घसरला, आता अपडेट खुश करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | मजबूत परतावा देणारा शेयर; टाटा स्टील शेअरची पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL NTPC Share Price | एनटीपीसी शेअर पुन्हा मालामाल करणार, यापूर्वी 464% परतावा दिला - NSE: NTPC Horoscope Today | 27 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

कोरोना लसीकरणात राजकारण नको | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन

Corona Vaccination, CM Uddhav Thackeray

मुंबई, १६ जानेवारी: संपूर्ण वर्षभर कोरोनासारख्या जागतिक महामारीशी लढा दिल्यानंतर आता अखेर देशवासियांना काहीसा दिलासा मिळणार असून कोरोना लसीची प्रतीक्षा आता अखेर संपली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात आजपासून (१६ जानेवारी) लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज राज्यव्यापी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सकाळी ११.३० वाजता मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) कोविड केअर सेंटरमध्ये या लसीकरणाचा शुभारंभ पार पडला. राज्यात आज पहिल्याच दिवशी तब्बल २८ हजार ५०० कोरोनायोद्ध्यांना लस दिली जाणार आहेत.

अजूनही संकट टळलेलं नाही. लस आली तरी काळजी घेतलीच पाहिजे. लस घेतल्यानंतरही मास्क वापरावा लागेलच. काही देशांत हे संकट पुन्हा दुप्पट वेगाने आले आहे. ते आपल्याकडे येऊ नये यासाठी काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. आज आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ‘केंद्र सरकारकडून कोविड लसीकरणाबाबत महत्त्वाच्या सूचना मिळाल्या आहे. त्यानुसार कोरोना काळात लढा देणाऱ्या योद्ध्यांना सर्वात आधी लस देण्याचे ठरले आहे. नाहीतर राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मीच पहिली लस टोचून घेतली असती. केंद्र सरकारकडून अद्याप लस मोफत देण्याबाबत कोणतीही सूचना आली नाही. लशीची किंमत किती असेल याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. केंद्राने याबद्दल भूमिका स्पष्ट केली तर राज्यात आम्ही पुढचा निर्णय घेऊ’ असं स्पष्ट केले.

 

News English Summary: A nationwide vaccination campaign has started today (January 16) against the backdrop of corona. Chief Minister Uddhav Thackeray has started statewide vaccination today. The vaccination was inaugurated by the Chief Minister at 11.30 am today at Mumbai Municipal Corporation’s Bandra-Kurla Complex (BKC) Covid Care Center. As many as 28,500 Corona fighters will be vaccinated in the state on the first day itself.

News English Title: Corona Vaccination started in Maharashtra in the presence of CM Uddhav Thackeray news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या