15 November 2024 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

अर्णब व्हाट्सअँप चॅट | सिक्रेट लष्करी कारवाईबाबत देखील आधीच माहिती असल्याचं उघड

Arnab Goswami, whatsapp chat, BARC CEO

मुंबई, १६ जानेवारी: ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्विटने खळबळ माजली आहे आणि त्यामुळे अर्णब गीस्वामी यांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण TRP घोटाळ्यासंदर्भातील व्हाट्सअँप चॅट समाज माध्यमांवर सार्वजनिक झालं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे चॅट रेटिंग एजन्सी बार्कचे सीईओ आणि अर्णब गोस्वामी यांच्यादरम्यानच असून, त्यातील विषय हा TRP घोटाळ्यासंबंधित असल्याने अर्णब गोस्वामी पूर्णपणे फसल्याची चर्चा आहे.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात घडलेल्या घटनेत रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या व्हाट्सअँप संवादाचा 500 पानी दस्तऐवज सोशल मीडियावर लीक झाल्याने अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. संबंधित चॅटमध्ये गोस्वामी यांचे पंतप्रधान कार्यालय आणि सत्तारूढ सरकारच्या सदस्यांशी जवळीक, टीआरपी त्यांच्या बाजूने झुकवणे आणि भाजपा सरकारची मदत घेण्याचे प्रयत्न आणि बरेच काही समोर येतं आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे पुलवामा हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले होते तेव्हा देश हळहळला होता. मात्र अर्णब अत्यंत खुश झाला होता हे त्यांच्या चॅट वरून सिद्ध होतंय. 14 फेब्रुवारी 2019 च्या एका चॅटमध्ये गोस्वामी म्हणतात “हा हल्ला आम्ही वेड्याप्रमाणे जिंकला आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर CRPF जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तब्बल 40 जवान शहीद झाले होते, त्याच दिवशी हा संवाद झाल्याने अर्णब गोस्वामी किती भीषण माणूस आहे याचा प्रत्यय आला आहे.

विशेष म्हणजे त्यानंतर बालाकोट स्ट्राईकच्या तीन दिवस आधीच अर्नबला त्याची माहिती असल्याचं चॅट मध्ये दिसतंय. देशाच्या सिक्रेट लष्करी कारवाईबद्दल त्याला माहिती कशी प्राप्त झाली आणि त्याचा थेट संबंध पीएमओ’शी जोडला जाऊ लागल्याने मोदींनी पायउतार व्हावं अशी मागणी समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.

 

News English Summary: The WhatsApp chats also reveal that Goswami allegedly had prior information about some sensitive events including the Balakot airstrikes, three days before it happened.

News English Title: Arnab Goswami whatsapp chat with BARC CEO leaked news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x