सिंधुदुर्गात ७० पैकी ५५ ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या |आमदार नितेश राणेंची माहिती
कणकवली, १८ जानेवारी: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. १५ जानेवारी रोजी राज्यातील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी सरासरी ७९ टक्के मतदान झाले. आज सकाळपासून या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.
कणकवली तालुक्यातील एकूण तीन ग्रामपंचायतींपैकी दोन शिवसेनेकडे तर एक भाजपकडे गेली आहे. तालुक्यातील भिरवंडे आणि गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेकडे, तर तोंडवली-बावशी ग्रामपंचायत भाजपकडे गेलीय.
कणकवलीत निकाल जाहीर होताच राणेंना धक्का असल्याच्या बातम्या चालू लागल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केलाय. नितेश राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही आणि येणार पण नाही, ७० पैकी ५५ ग्रामपंचायती आम्ही म्हणजेच भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
देवगड २३ पैकी १८
वैभववाडी १२ पैकी ९
कणकवली ३ पैकी १
मालवण ६ पैकी ५
कुडाळ ८ पैकी ४तरीपण सिंधुदुर्गात भाजप पिछाडीवर म्हणत असाल तर भाजप पिछाडीवरच अशीच पिछाडी कायम राहूदे!
😊😊😊— nitesh rane (@NiteshNRane) January 18, 2021
देवगड तालुक्यात 23 पैकी 18, वैभववाडी 12 पैकी 9 ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे. शिवसेनेकडे असलेल्या तोंडवली-बावशी, कुपवड़े, चिंदर, कोलगाव भारतीय जनता पक्षाने मिळविल्या आहेत. तर सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायत दहा वर्षेनंतर भारतीय जनता पक्षाकडून हिसकावून घेण्यात शिवसेनेला यश आले आहे माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिष्ठेची मानली जाणारी सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेकडून हिसकावून घेत माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांना जोरदार धक्का दिला आहे. जिल्ह्य़ातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून कोलगाव कडे पाहिले जात होते.भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी एकहाती वर्चस्व राखले आहे.
News English Summary: Reacting to the news that Rane was shocked when the results were announced in Kankavali, MLA Nitesh Rane claimed that the Bharatiya Janata Party had won the highest number of Gram Panchayats. The one who pushed Nitesh Rane has not been born yet and will come, but out of 70, we, the BJP, have won 55 Gram Panchayats, said Nitesh Rane.
News English Title: BJP MLA Nitesh Rane reaction over Gram Panchayat Election result news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC
- Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News