अर्णबला बालाकोट स्ट्राईकची आधीच माहिती असल्याचं संरक्षण खात्याला माहित होतं का ? | RTI ने प्रश्न
मुंबई, १८ जानेवारी: टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात घडलेल्या घटनेत रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या व्हाट्सअँप संवादाचा 500 पानी दस्तऐवज सोशल मीडियावर लीक झाल्याने अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. संबंधित चॅटमध्ये गोस्वामी यांचे पंतप्रधान कार्यालय आणि सत्तारूढ सरकारच्या सदस्यांशी जवळीक, टीआरपी त्यांच्या बाजूने झुकवणे आणि भाजपा सरकारची मदत घेण्याचे प्रयत्न आणि बरेच काही समोर आलं आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे पुलवामा हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले होते तेव्हा देश हळहळला होता. मात्र अर्णब अत्यंत खुश झाला होता हे त्यांच्या चॅट वरून सिद्ध होतंय. 14 फेब्रुवारी 2019 च्या एका चॅटमध्ये गोस्वामी म्हणतात “हा हल्ला आम्ही वेड्याप्रमाणे जिंकला आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर CRPF जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तब्बल 40 जवान शहीद झाले होते, त्याच दिवशी हा संवाद झाल्याने अर्णब गोस्वामी किती भीषण माणूस आहे याचा प्रत्यय आला आहे. विशेष म्हणजे त्यानंतर बालाकोट स्ट्राईकच्या तीन दिवस आधीच अर्नबला त्याची माहिती असल्याचं चॅट मध्ये दिसतंय. देशाच्या सिक्रेट लष्करी कारवाईबद्दल त्याला माहिती कशी प्राप्त झाली आणि त्याचा थेट संबंध पीएमओ’शी जोडला जाऊ लागल्याने मोदींनी पायउतार व्हावं अशी मागणी समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.
दरम्यान, लष्कराच्या सिक्रेट कारवाईबद्दल अर्णबला आधीच माहिती असल्याचं समोर आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे याचा थेट संबंध भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय आणिराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी जोडला जाऊ लागला आहे. त्यामुळे अर्णबला बालाकोट स्ट्राईकची माहिती असल्याचं देशाच्या संरक्षण मंत्रालयाला माहिती होतं का असा थेट RTI’ने विचारण्यात आला आहे. आरटीआय एक्टिविस्ट साकेत गोखले यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.
Is Defense Minister @rajnathsingh aware of Arnab Goswami’s chats where he knew of the Balakot air strikes in advance?
Has @DefenceMinIndia ordered a probe into this unauthorized leak of classified info & find out who did it?
The Modi govt is silent.
Ergo, filed an RTI. pic.twitter.com/QAG2CET5GI
— Saket Gokhale (@SaketGokhale) January 18, 2021
News English Summary: Many have been shocked to learn that Arnab already knew about the Army’s secret operations. Therefore, it is being linked directly to the Ministry of Defense and National Security Advisors of the Government of India. Therefore, RTI has directly asked whether the Defense Ministry was aware that Arnab was aware of the Balakot strike. RTI activist Saket Gokhale has raised this question.
News English Title: RTI activist Saket Gokhale asked question under RTI regarding Arnab Goswami having Balakot strike information in advance news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC