22 November 2024 11:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

ग्रामपंचायत निवडणुक | महाविकास आघाडीला ८० टक्के जागा | भाजपाची घसरगुंडी

Congress, state president Balasaheb Thorat, MahaVikas Aghdi, Gam panchayat election

मुंबई, १८ जानेवारी: राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज राज्यातील विविध भागांत सुरू आहे. या मतमोजणीचे बहुतांश कल आता स्पष्ट होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ग्रामपंचायत निकालांवर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील पक्षांना संपूर्ण राज्यात मिळून ८० टक्के जागा मिळताना दिसत आहेत. गेल्या वर्षभरात महाविकास आघाडीने सरकारच्या माध्यमातून केलेल्या कामावर जनतेने या निकालांच्या माध्यमातून शिक्कामोर्तब केले आहे. जनता आमच्या कामावर समाधानी आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करत भारतीय जनता पक्षाला जनतेने कौल दिल्याचा दावा केला आहे. राज्यातील ग्रामपंचायच निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हाच क्रमांक एकचा पक्ष बनला असून गावागावातील लोकांनी भाजपला समर्थन दिले आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

ज्याप्रकारे भारतीय जनता पक्षाला लोकांनी सर्मथन दिलं आहे त्याचा मला अतिशय आनंद आहे. आम्ही समर्थन दिलेले सगळे पॅनल ग्रामपंचयातीमध्ये चांगला विजय मिळवत आहेत. विशेष म्हणजे विदर्भ, मराठवाडा. उत्तर महाराष्ट्र, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल… सगळ्या भागात भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष झाला आहे. इतर पक्षांच्या तुलनेत आम्ही खूप पुढे गेलो आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये आम्ही सर्व जागा जिंकल्या आहोत. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

 

News English Summary: Reacting to the Gram Panchayat results, Balasaheb Thorat said that in the Gram Panchayat elections, the parties in the Maha Vikas Aghadi are getting 80 per cent seats in the entire state. Through these results, the people have sealed the work done by the Mahavikas Aghadi through the government over the last year. The people are satisfied with our work, said Balasaheb Thorat.

News English Title: Congress state president Balasaheb Thorat happy with MahaVikas Aghdi result in gram panchayat election news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x